Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १७ मार्च, २०२४

रमजान

 




** 


  • उच्च निच भेद मिटवतो
  • शिकवतो आम्हा बंधुभाव
  • असा पवित्र महिना एक
  • रमजान त्याचे नाव

  • देई शिकवण त्यागाची
  • फित्रा जकात देऊनी
  • मानुसकी जपण्याची 
  • सहनशीलतेने जगण्याची 

  • बेरीज करता पुण्याची
  • होई वजाबाकी दुष्कर्माची
  • सत्याचा मार्ग जरी खडतर
  •  शिकवण चालत राहण्याची


  • चांगले ते घेत रहावे
  • वाईट सारे सोडून द्यावे
  • ताबा चंचल मनावर
  •  ठेवा नियंत्रण भावनांवर

  • गरीब श्रीमंत दरी मिटवूनी
  • शुभेच्छा द्याव्या गळा भेटूनी
  • अन्न पाण्याचा त्याग करुनी 
  • पाचक तंत्रास आराम द्यावा


  • पावलो पावली जागवी इमान
  • नमाज पठन ऐकता अजाण
  • शांतीचा संदेश देई पवित्र कुराण
  • बंधुत्वाचे धडे देतो रमजान



  • नूरजहाँ फकृद्दीन शेख
  • गणेशगाव ता.माळशिरस
  • जी सोलापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा