*अकलुज ----प्रतिनिधी*
*लक्ष्मीकांत ---कुरुडकर*
**टाइम्स 45 न्युज मराठी.
माळशिरस तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करण्यात आला आहे मार्च महिना संपत आला तरीही प्रशासनाच्या वतीने माळशिरस तालुक्यात कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या दिसून येत नाहीत यामुळे सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत याचबरोबर मुक्या जनावरांनाही चाऱ्याअभावी आपले प्राण सोडावे लागत आहेत यामुळे माळशिरस तालुक्यात चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याचे टँकर तात्काळ सुरू करावेत अन्यथा स्वाभिमानीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल अशा आशयाचे निवेदन तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तहसीलदारांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले
यावेळी जेष्ठ नेते मगन काळे,
सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष भीमराव फुले, तालुकाध्यक्ष अजित बोरकर, शिवाजी चव्हाण,डॉ सचिन शेंडगे,सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष दत्ता भोसले,अमरसिंह माने-देशमुख , उमेश भाकरे ,तात्यासाहेब काळे, रायचंद खाडे,नाना काळे,संजय पवळ, गोपाळ घार्गे,शिवराम गायकवाड,दत्तात्रय गोरे,अरुण ढगे, डॉ.सचिन शेडगे,मदन काळे, वैजिनाथ बोरकर,दिनेश ताम्हाणे,शिवाजी ठवरे,विलास काळे,दादा काळे,राजेश खरात,विकास शिंदे,सचिन बोरकर, आप्पा शिंदे,आदित्य भोसले,नागेश चोरमले,सोमेश्वर राजगे,गोंडू पवार, आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते
लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व उमेदवारी मागण्यातच सत्ताधारी व विरोधक गुंतलेले आहेत सर्वसामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही यामुळे सर्वसामान्य जनता व शेतकरी मेटाकुटीला आला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माळशिरस तालुक्यात तात्काळ चारा छावण्या व टँकर सुरू केले नाहीत तर तहसीलदाना घेराव घालणार
अजित बोरकर, माळशिरस तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
दुष्काळग्रस्त माळशिरस तालुक्यात चारा छावण्या व पाण्याचे टँकर सुरू करावेत याचे निवेदन नायब तहसीलदार अमोल कदम यांना देताना मगन काळे, भीमराव फुले, अजित बोरकर, डॉ. सचिन शेंडगे सचिन बोरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा