Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १४ मार्च, २०२४

*विश्वेश्वरया टेक्निकल कॕम्पस"पाटगाव "मध्ये आंतर महाविद्यालयीन वार्षिक क्रिडा स्पर्धा संपन्न.*

 


*सांगली ----प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्युज मराठी

               विश्वेश्वरया टेक्निकल कॅम्पस पाटगाव (ता.मिरज) येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे दि ९ व १० मार्च २०२४ रोजी आयोजन करण्यात आले होते.अभियांत्रिकी महाविद्यालयीन मुलांमध्ये पुस्तकी ज्ञान बरोबर क्रीडा क्षेत्राची संस्कृती रुजवण्यासाठी,त्यांच्यात विविध खेळात आवड निर्माण व्हावी व खेळातील विविध गुणांचे प्रदर्शन करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. 



          या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव सतीश इंगवले,संचालक डॉ.इंद्रजीत यादव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. दि ९ मार्च २०२४ रोजी कबड्डी,खो-खो,बुध्दिबळ, कॅरम,रस्सीखेच इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील डिग्री व डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद दिला.



            दि १० मार्च २०२४ रोजी अंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या क्रिकेट स्पर्धेत विलिगडन कॉलेज सांगली,लठ्ठे पॉलिटेक्निक सांगली,पी.व्ही.पी.आ.य.टी कॉलेज बुधगाव,एस.बी.जी. आय.कॉलेज मिरज व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता.  

         या स्पर्धेत पीव्हीपीआयटी कॉलेज बुधगाव यांचा संघ विजेता ठरला व कॉलेजमधील डिग्री विभागातील मुलांचा संघ उपविजेता ठरला.या स्पर्धा पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष एस.डी.इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले.स्पर्धेवेळी कार्यकारी संचालक बाळासाहेब इंगवले,सर्व स्टाफ,डिग्री व डिप्लोमा विभागातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उस्फूर्त संख्येने उपस्थित होते.या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील सर्व स्टाफ व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा