*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
* मुंबई:--- एकीकडे महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच उद्या शिवसेना ठाकरे गटाकडून लढवल्या जाणाऱ्या १५-१६ जागांवरील उमेदवारांची घोषणा करणार असल्याची मोठी माहिती ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज सोमवारी दिली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून ठाकरे गटाच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात आज सायंकाळी शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत तसेच काँग्रेसकडून मुख्य नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी उद्या ठाकरे गटाच्या उमेदवारांची घोषणा होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
आज मातोश्री येथे होणाऱ्या बैठकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना शिवसेना ठाकरे गटाच्या १५ जागांवरील उमेदवारांची यादी दाखवली जाणार आहे. त्यानंतर उद्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून या उमेदवारांची घोषणा होणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. लोकशाहीचा रंग शिगेला गेला आहे. या देशामध्ये अनेकदा एकाधिकारशाही हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न झाला पण या देशातल्या लोकांनी लोकशाहीचे रक्षण केले. आताही प्रयत्न सुरू आहे. असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा