*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9730 867 448
माळीनगर-२, बीट दत्त चौक-४ या अंगणवाडीमध्ये जागतिक महिला दिन व पोषण पखवडा साजरा करण्यात आला.
यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच महिलांचे आरोग्य या विषयावर डॉ.तृप्ती फडे मॅडम यांनी महिलांच्या पाळीच्या तक्रारी, हार्मोन्स बदल, पीसीओडी प्रॉब्लेम्स, गर्भधारणा न होणे यावर मार्गदर्शन केले.
सौ.प्रज्ञा सांकला मॅडम यांनी शेतीवरील रासायनिक फवारण्यांचा दुष्परिणाम आरोग्यावर कसा होतो त्यासाठी आपण परसबागेमध्ये दररोज लागणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या यांची लागवड करून विषमुक्त पालेभाजी करावी व गंभीर आजारापासून दूर रहावे. आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्य कसे चांगले ठेवावे यावर मार्गदर्शन केले.
श्री.नितीन खरात सर यांनी महिलांच्या आरोग्य विषयक समस्येवर बोलताना महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता असते. त्यामुळे महिलांनी हाडाची ठिसूळता तपासणी करून घेणे का गरजेचे आहे. कोणता आहार घेतला पाहिजे, किती व्यायाम केला पाहिजे. आपले कुटूंब कसे निरोगी ठेवता येईल व मोबाईलचे दुष्पपरिणाम याबद्दल मार्गदर्शन केले.
अंगणवाडी पर्यवेक्षिका रंजना कदम मॅडम यांनी पोषण पखवडा बद्दल सांगताना दररोजच्या आहारामध्ये तिरंगी स्वरूपात आहार कसा घ्यावा याबद्दल माहिती दिली.
लिनेन्स क्लब अकलूज च्या अध्यक्षा राजश्री जगताप यांनी महिलांना मार्गदर्शन करून त्यांच्या वतीने खाऊ वाटप केला. यावेळी महिलांचे फनीगेम घेण्यात आले व विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ.रंजना कदम मॅडम व सौ.अरुंधती हजारे मॅडम बीट मधील सर्व सेविका, मदतनीस व पालक यांचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा