*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
वडापाव खायला देण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जावून एका तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार संतोषनगर कात्रज परिसरात घडला आहे.
सर्वात गंभीर प्रकार म्हणजे या दुष्कृत्यात नराधमाच्या पत्नीने त्याला मदत केली आहे.
याप्रकरणी,
भारती विद्यापीठ पोलिसांनी प्रल्हाद साळुंके (वय.४८ )
आणि त्याची ४५ वर्षीय पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. प्रल्हाद याला अटक देखील करण्यात आली आहे.
याबाबत १९ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
ही घटना दुपारी दोन वाजता ते रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पिडीत तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. पिडीत तरुणीची आई भाजी विक्रीचा व्यवसाय करते
तर आरोपी महिला देखील भाजी विकते. त्यातून त्यांचा परिचय आहे.
पिडीत तरुणी भाजी मंडई येथे रस्त्याने पायी चालत निघाली होती.
त्यावेळी प्रल्हाद याच्या पत्नीने तिला गोड बोलून वडापाव खायला देते,
असे सांगून आपल्या राहत्याघरी घेऊन गेली.
तरुणी देखील तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आरोपीच्या घरी गेली.
त्यानंतर तिने तरुणीला आणि तिचा पती प्रल्हाद याला घरामध्ये ठेवून बाहेरून कडी लावली.
प्रल्हाद याने तरुणीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. प्रल्हाद याच्या पत्नीने त्याला मदत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान तरुणी जेव्हा घरी परतली तेव्हा ती रडत होती,
कोणाशी बोलत नव्हती.
तिच्या आईने याबाबत विचारले असता, आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराची माहिती तिने दिली.
त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी प्रल्हाद याला अटक केली आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा