*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अकलूज आणि परिसरात गुटखा मटका जुगार आणि हातभट्टी हे अवैध अवैध धंदे जोमात असून इतर जीवनावश्यक व्यावसायिक मात्र कोमात आहेत 1 रुपयाला 90 रुपये मिळतात अशा आमिषाला बळी पडून गोरगरीब भोळी भाबडी जनता या आशेपोटी पोटी स्वतःच्या पोटाला चिमटे घेऊन वेळप्रसंगी उपाशी राहून मटका मात्र लावतात कारण त्यांना आमिष दाखवलेले असते की तुम्ही 1 रुपयाचे 2 अंक (जोडी) लावले तर तुम्हाला 90 रुपये मिळतील परंतु ती भोळी भाबडी जनता त्या अमिषाला बळी पडतात हाती मात्र भोपळा येतो अकलूज संग्राम नगर भागात "रत्नपुरी "मध्ये एका मालकाची मटका बुकी चालत असून त्यांची शेकडो एजंट या परिसरात पसरलेले आहेत त्या एजंटामार्फत मटका घेऊन दररोज लाखो रुपये लुटले जातात मात्र ज्या आशे पोटी ज्या गोरगरीबाने अंक लावला तो अंक न येता किंवा जाणून-बुजून न येता दुसराच अंक येतात आणि किमान 100 मधून एका व्यक्तीला ती मटक्याची लॉटरी लागते म्हणजेच एक टक्का जावक परंतु 99% आवक या बुकिवाल्यांचे असते तरी अशा या गोरगरिबांना लुटणाऱ्या बुकी वाल्यांवर जिल्हा पोलीस प्रमुख कारवाई करून गोरगरिबांचे उद्ध्वस्त होणारे संसार वाचवतील का? असे नागरिकाकडून बोलले जात आहे
हे सर्व प्रकार संबंधीत प्रशासनास दिसत नाही?
या अवैध मटक्याकडे सामान्य गरीब आणि कष्टकरी माणुस आकर्षित हैतृ कारण मागील वर्षी पाऊस पडला नसल्यामुळे सर्वत्र पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून मजुरांच्या हाताला काम नाही आणि मजुरांना जरी काम मिळाले तरी समाधानकारक पगार नाही त्यामुळे हे सर्वसामान्य मोल मजूर हे मटक्याच्या अमिषाकडे आकर्षित होतात आणि त्या पगारातल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम मटक्यावर खर्च करतात कारण ते आमिषाला बळी पडतात 1 रुपयाचा लावला तर 90 रुपये येतात त्यामुळे 10 रुपयाचा लावला तर 900 रुपये येतील या आशेपोटी मटका लावतात त्यामुळे प्रपंचात पैशाची चणचण निर्माण होते पतीने कामावरून येताना 50% पगार मटक्यावरच खर्च केला उर्वरित पैसे घरी जाता जाता दारूवर घालवले तर त्या गृहिणीने आपला प्रपंच कसा चालवावा ?आणि मुलाबाळांचा सांभाळ कसा करावा हा महत्त्वाचा प्रश्न आहे? जर या मटक्यावाल्यांनी आमिष नाही दाखवले तर किमान मटक्याचे तरी पैसे प्रपंचात उपयोगी पडतील मात्र या अवैध धंद्या वाल्यांना त्याचे काही देणे घेणे नाही, तो जगाला काय! उपाशी मेला काय !! याचीही त्यांना परवा नसते तरी या मटक्यावर प्रशासन कारवाई करणार का असे गृहिणीतून आर्तहाक येत आहे.
पाहु या प्रशासन या अवैध धंद्यावर कारवाई करणार कि त्यांना पाठीशी घालणार ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा