Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

*"शरद पवार "यांचा लोकसभा प्रचाराचा मेगा प्लॅन --22 दिवसात राज्यभर-- 50 सभा घेणार!...*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

बारामती - 17 एप्रिल :-- लोकसभा निवडणुकीची घोषणा आता महिना उलटला आहे.भाजप, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असल्याने शरद पवार – उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही प्रतिष्ठा पणाला लावली आहे. याच धर्तीवर शरद पवारांनी आपल्या उमेदवारांसाठी राज्यभर सभांचा धडाका लावला आहे.



शरद पवारांनी आपला पाच ते सहा दशकांचा राजकीय अनुभव पणाला लावला असून एक एक पत्ते उघडण्यास सुरुवात केली आहे. त्यातच अजित पवारांच्या निकटवर्तींयांसह भाजप, शिवसेनेत नाराजांकडे विशेष मोर्चा वळवला आहे. याचसोबत आता पवार राज्यात लोकसभा निवडणुकासाठी सभांचा धडाका लावणार आहेत. अवघ्या २२ दिवसांत राज्यभरात तब्बल ५० सभा ते घेणार आहेत. शरद पवारांनी बंडखोरांनी या निवडणुकीत धडा शिकवण्याचा विडाच उचलला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा