*श्रीपूर ----बी.टी.शिवशरण.
आज सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची यात्रा सुरू झाली आहे शिखर शिंगणापूर यात्रेला जाण्यासाठी निघालेल्या शेकडो चार चाकी वहांनातील यात्रेकरूंची वहाने सातारा जिल्ह्यातील बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी शिंगणापूर गावापासून सुमारे पाच किमी अंतरावर वहाने रोखली व सदर वहाने घाटात पार्किंग करून तेथून पायी चालत जाण्यासाठी दबाव टाकला त्यामुळे भर रणरणत्या उन्हात यात्रेकरुंना नाईलाजास्तव पाच किमी अंतर पायीं चालावे लागले यात वृध्द लोक लहान मुलं महिला यांचे प्रचंड हाल झाले विशेष म्हणजे पोलिसांना त्या बाबत विचारणा केली तर ते अत्यंत उद्धट व अरेरावी भाषेत बोलून यात्रेकरुंना दटावत होते तुम्ही आम्हाला विचारु नका एसपी साहेबांना बोला म्हणून एकही वहान ते पुढे जाऊ देत नव्हते यात्रेकरूंनी सांगितले की असे कधीच झाले नाही हे पहिल्यांदा झाले आहे सातारा पोलिसांच्या मनमानी वर्तनाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होत आहे
गेल्या वर्षी वाहने सोडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती म्हणून पोलिसांनी यावर्षी जिल्हाधिकारी यांच्या सुचने नुसार मुख्य मंदिराकडे वाहने सोडली गेली नाहीत
उत्तर द्याहटवा