*मुख्य संपादक---हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448
माळशिरस तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून 'गणेश खैरे 'यांच्या मनमानी कारभाराबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यांना निवेदन देण्यात आले असुन . गणेश खैरे वर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले असुन सब जेल मध्ये असलेल्या आरोपीला भेटायला आलेल्या नातेवाईकांना आरोपीना भेटायचे आसेल तर नातेवाईका कडून पैशाची मागणी केली जात आहे . तसेच दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी याच तुरुंगाधिकारी गणेश खैरे यांनी बेकायदेशीरपणे कोणतीही परवानगी नसताना अगर तशा अर्ज प्राप्त नसताना जवळपास दहा ते पंधरा लोकांना बेकायदेशीरपणे काय ज्यांना भेटण्यासाठी सब जेलमध्ये सोडले होते त्याबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागितली असता माहिती न देता कार्यकर्त्यांना अरेरावी ची भाषा वापरणे ,
. पैसे घेऊन आरोपींना भेटण्यास सोडणे, आरोपींना नातेवाईकांना पैशाची मागणी करणे ,.त्याबाबत वंचित बहुजन आघाडी कडे .काही तक्रारी आल्या आहेत . त्या अनुषंगाने सदर तुरुंगाधिकारी गणेश खैरे यांचे - कृत्य अशोभनिय आहे .त्याची योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी . जेलर पदावरून त्यांची चार्ज काढून इतरत्र बदल करावी .अशी मागणी चे निवेदन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तहसिलदार शेजवळकर याना देण्यात आले आहे
. या प्रसंगी युवा जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे ,महासचिव आणा वाघमारे ,जिल्हा कोषाध्यक्ष- अभिमान जगताप नितिन सरवदे तालुका अध्यक्ष-- अभिजित गायकवाड ,उपाध्यक्ष-- अक्षय देटे ,समाधान साबळे, विकास नलावडे ,बाळासाहेब गायकवाड ' सुमित सावंत ,बाळासो गायकवाड ,दळवी . आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा