*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
‘मेरा परिवार, मेरा परिवार’ असे नरेंद्र मोदी म्हणत आहेत. मात्र, देशातील तरुण बेरोजगार आहेत. मोदी एके मोदी हाच त्यांचा परिवार आहे. मोदींविरोधात राज्यातील आणि देशातील शेतकरी पेटून उठले आहेत. आता मोदींना शिंगावर घेतल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही. आता गद्दारांच्या खुर्चीला मशाल लावण्याची वेळ आली आहे. गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात मोदींनी काय केले हेच ते सांगत नाहीत. मोदींचे नाणे आता महाराष्ट्रात चालत नाही. हिंमत असेल तर मोदींचे फोटो लावून मत मागे. मोदींची हवा आता संपलेली आहे. मोदी, शहांनी त्यांच्या सात पिढ्यांचा इतिहास सांगावा, असे आव्हानही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. उद्धव ठाकरे नांदेडमध्ये सभेत बोलत होते.
देशात सध्या हुकूमशाही आहे. त्यांच्या पक्षाचे अध्यश्र जे.पी. नड्डा म्हणाले होते, देशात एकच पक्ष राहील, त्यांची ही एकाधिकारशाही मान्य आहे काय. ते शिवसेनेला नकली शिवसेना म्हणत आहेत, त्यांचे अंधभक्त आहेत, त्यांचीही हीच अवस्था आहे. त्यांना 400 जागा संविधान बदलण्यासाठीच हवी आहे. कलम 370 काढण्यासाठी आम्ही पाठिंबा दिला होता. अनेक चांगल्या गोष्टींना पाठिंबा दिला. त्यांना 400 जागा फक्त संविधान बदलण्यासाठीच हव्या आहेत. त्यांनी संसदेत विरोधी पक्षातील 150 खासदारांना निलंबित केले. त्यानंतर त्यांनी हवी तशी मनमानी पद्धतीने विधेयके मंजूर करून घेतली. आता त्यांना 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या,तर ते संविधान बदलण्याची भीती आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आता त्यांना 400 जागा संविधान बदलण्यासाठीच हव्या आहेत. संविधान बदलल्यानंतर विरोधात कोणीही बोलायला नको. रशियात पुतीन यांनी जे केले तेच सध्या देशात होत आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर महाराष्ट्राची लूट थांबवणार, महाराष्ट्रचे लुटून नेलेले वैभन पुन्हा महाराष्ट्रात आणणार, शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देणार, पीक विमा घोटाळा आहे, कोट्यवधी रुपये विमा कंपन्यांकडे जात आहेत. त्यांनी विमा कंपन्यांकडूनही निवडणूक रोखे घेतले असतील तर ते गंभीर आहे. हुकूमशाही सरकार हवे की संमिश्र आणि प्रत्येक प्रातांचे सन्मान राखण्याचे सरकार हवे आहे, याचा विचार आता जनतेने करायचा आहे, असेही ते म्हणाले.
दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे टाकून, बंदूका ऱोखून अडवले. आता राज्यातील शेतकरी मोदी सरकारचा दिल्लीत जाणारा रस्ता बंद करेल. देशातील आणि राज्यातील शेतकरी आता शेतकरी म्हणून मतदान करेल आणि भाजपचा दिल्लीचा रस्ता रोखेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा