इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत सुळे विरूद्ध पवार नसून मुळ पवार विरुद्ध दुसरे पवार अशीच लढत होत आहे. त्यामुळे मुळ पवार असणाऱ्या सुप्रिया सुळेंना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी केले.
गणेशवाडी (ता.इंदापूर) येथे बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सौ सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित गावभेट दौऱ्यात त्या बोलत होत्या. यावेळी ॲड तेजसिंह पाटील, अशोक घोगरे, सागरबाबा मिसाळ, दिलीप लोहकरे, अशोक पापत, सुरेश घोगरे, हरिभाऊ घोगरे, अश्विनी साठे, मुमताज फुलारी, अलका खंडागळे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शर्मिला पवार पुढे म्हणाल्या, शरद पवार यांच्याकडे आजही जेष्ठ नागरिक व तरूणांमध्ये मोठे आकर्षण दिसून येत आहे. तसेच त्यांच्या दुरदृष्टी नेतृत्वाखाली बारामती व परिसरात शिक्षण संस्था, कृषी विकास प्रतिष्ठान, सोसायटी, दुधसंघ असे विविध संस्था, एमआयडीसी उभारल्याने अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे. शरद पवार वडिलधारी आहेत त्यामुळे त्यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कोणालाही घरात कलह, व्देश, भांडण नको असतात. परंतू राजकारणातील समीकरणे हे दिवसेन दिवस बदलत चालली आहेत. प्रत्येकांना सत्ता, पैशाचा हव्यास वाढत चालला आहे. दोन कुटुंबांचा संसार व्यवस्थित चालला होता. परंतू शरद पवार यांच्या कडून पक्ष, चिन्ह काढून घेवून बेघर करण्याचे काम करण्यात आले आहे. आमच्या वडीलधाऱ्यांवर अन्याय करणारं असाल तर आम्हीं कोणीही तो सहन करणार नाही. शरद पवारांनी आमच्या कुटूंबीयावर आदर्श संस्कार घातले आहेत ते कोणीही मोडणार नाहीत. निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली असल्यामुळे एकीकडे नेते विरूद्ध जनता असा सामना पहावयास मिळणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार, सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, फौजिया खान व जयदेव गायकवाड या पाच जणांना निधी विकास कामासाठी दिला जातो. त्यामुळे विकास जोरात केला जात असल्याचे शेवटी शर्मिला पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका संघटीका अश्विनी साठे यांनी सुत्रसंचलन आकाश घोगरे यांनी तर आभार नंदकुमार शिंदे यांनी मानले.
फोटो - गणेशवाडी येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात गावभेट दौऱ्यात बोलताना शर्मीला पवार व उपस्थित मान्यवर दिसत आहेत.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा