*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अकलूज येथे अकलूज- वेळापूर रोडवरील, माळेवाडी- संजय नगर, जवळ पतीने पत्नीची चाकूने भोकसुन खून केला आणि स्वतः ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून त्याबाबत पोलीस सूञाकडून मिळालेली माहिती अशी की,
फिर्यादी मैनुद्दीन कासम शेख वय 55 वर्षे व्यवसाय टू व्हिलर गॅरेज, रा. चिंचोलीरोड, सांगोला ता. सांगोला जि. सोलापूर यांची मुलगी आफ्रिन फिरोज काझी वय 37 वर्ष हिला अकलुज येथील फिरोज हुकमुद्दीन काझी रा. गुरुनगर, काझीगल्ली, अकलूज ता. माळशिरस यास दिले होते. फिरोज हा खाजगी नोकरी करतो तसेच त्याची पत्नी आफ्रिना ही देखील सन 2020 पासून सांगोला येथे विद्यामंदिर या खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करीत होती. त्यांना मुलगा मोईन वय 15 वर्षे व मुलगी जिया वय 8 वर्षे अशी दोन अपत्य असून ती सध्या सोमवार ते शुक्रवार पर्यंत तिचे वडीलांकडे मुलीसह राहत होती व शनिवार, रविवार सुटटी दिवशी ती तिच्या मुलीला घेवून अकलुज येथे पतीकडे येत होती. सन 2022 मध्ये त्यांचे कौटुंबीक भांडण झाले होते त्यावेळी दोन्ही बाजुच्या लोकांनी आपसात मिटविले होते परंतु तरी देखील फिरोज हा आपली पत्नी आफ्रिन हिने सांगोला येथील नोकरी सोडून देवून अकलुज येथे यावे या कारणावरुन त्यांचेत डुसपूस चालू होती.
दिनांक 14/04/2024 रोजी आफ्रिन फिरोज काझी ही तिची लहान मुलगी जिया हिचेसह सांगोला येथुन अकलूजला येथे पतीकडे आली होती. त्यानंतर पतीने त्यांना जस्मीन कापड दुकानात नेवून नवीन कपडे खरेदी करुन दुपारी 3.30 वा.चे सुमारास स्वतःचे मोटार सायकलवर पत्नी आफ्रिन व मुलगी जिया यांना बसवून अकलुज वेळापूर रोडने निघाले असताना माळेवाडी अकलूज चे पुढे आलेवर संजयनगरकडे जाणारे रोडजवळ आलेवर आफ्रिन हिला, तु सांगोला येथे राहू नको, तेथील नोकरी सोडून दे, तु अकलुजला रहायला ये असे म्हणून त्यांचेत वाद झाला. तेव्हा तिने मी सांगोला येथील नोकरी सोडून अकलुजला येणार नाही असे म्हणाल्याने लगेच फिरोज याने त्याचेजवळ पिशवीमध्ये आणलेला चाकू काढून चाकूने तिच्या गळयावर भोकसले व तिला जखमी अवस्थेत सोडून मुलगी जिया हिला मोटार सायकलवरुन त्यांचे घरी आला व त्याचे घरी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सदर घटनेची माहिती अकलुज पोलीसांना समजताच अकलुज पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी निंभोरे साहेब, गुन्हे प्रकटरण शाखेचे पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत पडलेली आफ्रिन हिला उपचाराकरीता तात्काळ खाजगी अॅम्ब्युलन्स बोलावून उपचाराकरीता पोलीस अंमलदार सोबत उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे रवाना केले परंतु वैदयकिय अधिकारी यांनी जखमीस तपासून ती मयत झाल्याचे सांगितले. सदर घटनेची माहिती मयतेचे वडील मैनुद्दीन कासम शेख यांना त्यांची नात जिया हिने फोनवरुन कळविल्याने मैनुद्दीन शेख हे अकलुज येथे आले. त्यांनी सरकारी दवाखान्यात जावून मयत मुलीचे प्रेत पाहिले व घटनेची माहिती घेवून त्यांचे मुलीचा खून जावई फिरोज काझी यांनी केला म्हणून तक्रार अकलुज पोलीस ठाणेस दिल्याने सदरची तक्रार पोलीस उपनिरीक्षक बबन साळुंके यांनी तक्रार घेऊन गुन्हा रजिस्टर नंबर 197/2024 भा.द.वि.सं.क. 302 प्रमाणे दिनांक 15/04/2024 रोजी गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी हा अकलाई हॉस्पीटल, अकलूज येथे उपचार घेत आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक शिरीश सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, नारायण शिरगांवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेकडील पोसई डी. टी.शिंदे ने. अकलुज पोलीस ठाणे हे करीत आहेत.
पोलीस निरीक्षक,
अकलूज पोलीस ठाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा