Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १४ एप्रिल, २०२४

*"शरद पवार" यांच्यामुळे तुतारी वादकांच्या जीवनात पुन्हा सोनेरी दिवस..* *लोकसभेच्या निवडणुकीत तुतारीच्या उमेदवारांचे स्वप्न साकार व्हावे --कार्यकर्त्यांची इच्छा*

 


*ज्येष्ठ पञकार--संजय लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी


पाश्चात्य संगीताच्या आक्रमणामुळे भारतीय शास्त्रीय संगीताचे व वाद्यांचे स्वर पडद्याआड होत चालले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठी तुतारी चिन्ह दिल्यामुळे गेले काही वर्षांपासून दूर गेलेले तुतारीचे सूर आता सर्व कार्यक्रमात लोकांच्या कानावर पडू लागले आहे.त्यामुळे भारतातील जुन्या वाद्य वादकांचे जीवनात पुन्हा सोनेरी दिवस आले आहेत.



           पुर्वीच्या काळी भारतीय संगीत व वाद्यांचे सूर जगामध्ये प्रसिद्ध झाले होते पण आज कालच्या चित्रपटामध्ये परदेशी संगीताचे अतिक्रमण झाले व भारतीय संगीतातील वाद्याचे सूर हळूहळू दूर गेले.पुर्वीच्या काळी गावात सण समारंभ असो मिरवणूक असो,थोर नेत्यांची जयंती असो किंवा राजकीय नेत्यांचा कार्यक्रम असला तरी तेथे हलगी,घुमके,तुतारी, पिपाणी,झांज,लेझीमचा आवाज कानावर पडत होता पण आजकाल तर डिजेच्या कर्कश्य आवाजाचे संगीत मोठ मोठ्याने कानावर पडत असल्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावे लागत आहे‌.मोठ्या आवाजामुळे काही काही लोकांना हृदय विकाराच्या झटका येऊ प्राण ही गमवावे लागले आहे.आजकाल परदेशातील नागरिक भारतीय संगीताचा अभ्यास व संगीत कला शिकायला भारतात येत आहेत.



          जनतेला अच्छे दिन येणार असे म्हटले जात असताना.गेले दहा वर्षांत किती जणांच्या आयुष्यात अच्छे दिन आले आहेत ? हा पण मोठा प्रश्न आहे.काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजन झाले.त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी चिन्ह देण्यात आले आहे.त्यामुळे आता वाड्यावस्ती पासून गावागावांमध्ये शरदचंद्र पवार साहेबांच्या तुतारीचा आवाज मतदारांच्या कानावर घुमू लागला आहे.

        तु-तारी म्हणजे तुच तारणारा याचाच अर्थ देशात व राज्यात जातीय द्वेष निर्माण करणाऱ्या स्वातंत्र्यानंतर अभूतपूर्व घोटाळा करणाऱ्या सुशिक्षित युवकांना बेरोजगार करणाऱ्या महागाई गगनाला भिडवणाऱ्या तसेच ठराविक समुदायाला टारगेट करुन मारणाऱ्या सत्ताधाऱ्यापासून तु--तारी ( तूच तारणारा)(शरद पवार) आहे अशी महाराष्ट्रातील जनतेची भावना झाली आहे याची चाहूल मोहिते पाटलांना झाली आसावी म्हणुन शरद पवार यांची तुतारी हाती घेत आहे हे उचलले पाऊल योग्य आहे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

           ज्या प्रमाणे तुतारी वादकांच्या जीवनात पुन्हा सोनेरी दिवस आले तसेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा केलेल्या उमेदवारांचे स्वप्न साकार व्हावे अशी अपेक्षा कार्यकर्त्यांतून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा