उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स ४५ न्युज मराठी
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर*
अज्ञानाचा होता अंधार
विषमतेने ग्रासलेला समाज
माणसास माणूस म्हणून जगण्याचा न्हवता अधिकार !!
उच्च नीच कनिष्ठ होता भेद
अधीकार न्हवता शिक्षणाचा अस्पृश्य म्हणून हिनवले जाई
मुभा न्हवती वाचण्यास वेद !!
चौदा एप्रिल दिवस उगवला
तेजस्वी सूर्याने जन्म घेतला विषमतेचा काळोख मिटवला
ज्ञानाचा दिवा ऐसा लावला !!
क्रांतीची मशाल पेटवली
मनुस्मृती जाळून टाकली माणसातील दरी मिटवली
समानतेची बीजे रोवली !!
हिंदू, मुस्लिम,सिख,इसाई
अनेक भाषा, धर्म ,जाती
सर्वच एकमेकांचे भाई भाई
भीमाचीच हो ही पुण्याई !!
जरी मी इस्लाम धर्मीय
अभिमान मला भीमाचा
आधार वाटतो आम्हा आमच्या संविधानाचा आमच्या भीमाचा !
नूरजहाँ फकृद्दीन शेख
गणेशगांव ता. माळशिरस
जिल्हा सोलापूर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा