*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
वसंतदादा पाटील घराण्याला नेस्तनाबू करण्यासाठी जेजेपी च्या धुरंदराला त्याची पात्रता दाखवण्यासाठी , दादा -बापू - मदनभाऊ घराण्याचे नामोनिशान मिटवणाऱ्या व "गनिमी कावा " करून स्वतः नामानिराळे राहणाऱ्या त्या "धूर्त - कावेबाज" ला धडा शिकवण्यासाठी यंदाची सांगलीची 2024 ची लोकसभा निवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर "लक्ष्यवेधी" ठरणार आहे.
भाजपचे संजय पाटील,महाआघाडी चे चंद्रहार पाटील आणि लिफाफा (पाकीट ) हें चिन्ह घेतलेले अपक्ष विशाल पाटील यांची "प्रतिष्ठा" आज पणास लागल्याचे चित्र आहे . अजित पवार* यांचे "धुरंदर" मैनुद्दीन बागवान ,सुरेश आवटी यांच्यासह बहुतांशी नगरसेवक "महायुतीमध्ये" असताना देखील आज "विशाल पाटील" यांच्या "गोटात" आहेत व दिवसाची "रात्र" करत विशाल यांच्या विजयासाठी जीवाची बाजी लावत आहेत .विशाल यांचा "विजय" म्हणजे त्या इस्लामपूर मधील वजनदार प्रतिस्पर्ध्याचा" पराभव व अजित पवार यांचा अप्रत्यक्ष विजय असा देखील हा "अर्थ" आणि सूत्र असू शकते. "काट्याने" असा ही काटा काढता येतो हें देखील निवडणुकीच्या निमित्ताने आज पाहावयास मिळत आहे
संजय पाटील
गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळणारी परंतु वंचितकडे वळलेली गोपीचंद पडळकर यांना मिळालेली तीन लाख मते यावेळी नसणार आहेत. त्यामुळे या 3 लाखांची मतांची "विभागणी" आणि वंचित चे प्रमुख .प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला विशाल पाटील यांना दिलेला जाहीर पाठिंबा आणि अपक्ष विशाल पाटील यांच्या "पारड्यात" पडणारी ती "मते" हा यावेळी सर्वात मोठा "टर्निंग पॉईंट" असणार आहे .तो 3 लाखाचा फरक "चंद्रहार पाटील" भरू शकणार नाहीत. त्यामुळे याचा फटका अर्थात संजय पाटील यांना बसू शकतो. त्यामुळे सलग "दोन वेळा" भाजपचे खासदार राहिलेले संजय पाटील यांच्यासाठी यावेळची निवडणूक "सोपी" नाही हें विविध ठिकाणी केलेल्या "सर्व्हेतून" स्पष्ट होत आहे.
संजय पाटील यांनी केंद्र सरकारच्या योजना त्यांनी पूर्ण केल्या आहेत. टेम्भू योजना तसेच अनेक "विकासकामांचा" सपाटा त्यांनी लावला होता, परंतु आज परिस्थिती "विदारक" निर्माण झाली आहे . 10 वर्षात त्यांनी अफाट काम केले तथापि काही नेत्यांमधील वैयक्तिक हेवेदावे, तिकीट न मिळाल्याने झालेली नाराजी आणि मोदी जादू ने केलेली "पीछेहाट" त्याशिवाय काँग्रेस पक्षाने जिंकणारा घोडा असताना देखील विशाल पाटील यांना "न दिलेली" उमेदवारी , त्यामुळे नाराज व चिडलेली जनता यामुळे संजय पाटील यांच्या मतांमध्ये यावेळी वजाबाकी ची चिन्हे आहेत. त्याशिवाय भाजपाचे नगरसेवक आणि मित्रपक्षांमध्ये असणारे त्यांचे काही नगरसेवक व त्यांची घटलेली संख्या आणि "भाजपा विरोधी" वाहत असणारे वारे ,आणि कमी झालेली लोकप्रियता यामुळे सध्या संजय पाटील पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. "एकगठ्ठा " भाजपचे मतदान यंदा संजय पाटील यांना "तारणार" का ?? हाच यक्षप्रश्न आहे .
विशाल पाटील
कधी कधी पक्षाचे तिकीट न मिळणे हें देखील फायदेशीर ठरू शकते हें विशाल पाटील यांच्या उमेदवारी वरून स्पष्ट होते. विशाल यांना तिकीट मिळावे म्हणून जेवढी "हवा" होती त्याच्या दुप्पट विशाल यांच्यावर अन्याय झाला म्हणून प्रचंड "सहानुभूती " निर्माण झाली आहे. या सहानुभूतीच्या लाटेचा उद्रेक-- आणि सांगली च्या स्वाभिमानाचा "विस्फोट" सांगलीकर 7 मे च्या निवडणुकीत* दाखवणार असे दिसत आहे. अल्पसंख्यांक -मुस्लिम समाजाचा कल आणि प्रेम "दादा - बापू -मदनभाऊ" घराण्यावर "पारंपरिक" आहे. त्याशिवाय "मराठा बांधवांचे" होणारे "लक्ष्यवेधी" मतदान जमेची बाजू असू शकते .त्यामुळे यावेळी विशाल पाटील "चमत्कार" घडवू शकतात असे दिसते . त्याशिवाय प्रामुख्याने सांगली -मिरज शहरात पसरलेले "विशालमय" वातावरण आणि भाजपा मध्ये न दिसणारा उत्साह यादेखील जमेच्या बाजू असू शकतात. मतदार ,सध्यस्थितीत असणारे नगरसेवक ,सहानुभूतीची अभूतपूर्व लाट ,जेजेपी विषयी असणारी प्रचंड चीड यामुळे 2024 मध्ये "चेकमेट" बसणार असे दिसते . सांगली - मिरज शहरात आणि ग्रामीण भागात असणारी सहानुभूतीची प्रचंड लाट विशाल यांना लोकसभेत घेऊन जाणार का ??? दादा - बापू गट -मदनभाऊ गट वंचित ,अल्पसंख्यांक - मुस्लिम आणि "मराठा" बांधव यांच्यामुळे "विशाल" यांचे पाकीट (लिफाफा ) आज तरी वजनदार झालेले दिसत आहे . . चंद्रहार पाटील
महाआघाडीचे शिवसेनेचे तरुण -तडफदार उमेदवार चंद्रहार हे राजकारणात "नवखे" आहेत. कुस्तीमध्ये "अनभिक्षित सम्राट" असणे वेगळे आणि एकदम लोकसभेच्या मैदानात आपले कसब दाखवणे वेगळे हें त्यांनी ओळखले नाही असे दिसते. प्रारंभी आमदार म्हणून दमदार "छाप" पाडत सांगलीकरांची मने जिंकत त्यांनी पायाभरणी करायला हवी होती. राजकीय डावपेच आणि कुस्तीचा डाव यातील तफावत लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. राजबिंडा -कर्तृत्वसंपन्न पैलवान ही ओळख छोट्या -छोट्या राजकीय पटलावरून दाखवत भविष्यात "मोठा डाव" खेळला जाऊ शकतो . असो ,एक चांगला "अराजकीय" कुस्तीपटू चे राजकीय मंचावर शुभारंभ झाले आहे ,हें ही नसे थोडके ! आज ग्रामीण भागाचा विचार केल्यास विद्यमान खासदाराला पर्याय म्हणून "विरोधाला विरोध" म्हणून धक्कादायक रित्या काही लाखाच्या वर मतदान चंद्रहार घेऊ शकतात असे चित्र आहे . आज तिन्ही उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणास लावली आहे .पाहूया घोडा - मैदान लांब नाही .पाहूया काय होतंय ते ...!
इकबाल बाबासाहेब मुल्ला
( पत्रकार )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली .
मोबाईल - 8983587160






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा