Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

*प्रभू श्रीराम--श्रीराम नवमी*

 


*प्रभू श्रीराम*


 राम महिमा अपार 

रामसेवा खरी शक्ती

जगी प्रभू श्रीरामाची

श्रेष्ठ मातृपितृभक्ती ॥१ ॥


नीतीधर्म नीतीतत्वे

बंधुप्रती प्रेमभाव

रामरूपी फलश्रुती

मनी दया भक्तिभाव ॥२ ॥


सारे वैभव त्यागुनी

 चौदा वर्षे वनवास

पादुकांची साक्ष सांगे

बंधुभेट खरी आस ॥ ३ ॥


लोकप्रिय धर्मप्रिय

राम शोभे सीतापती 

दशरथ कौशल्याचा

राजपुत्र रघुपती ॥ ४ ॥


असामान्य सत्यनिष्ठा

थोर संयमी श्रीराम 

नित्य भगवंता स्मरू 

मुखी घेऊ रामनाम ॥ ५ ॥


राजा सर्वोत्तम गुणी

होऊ कसे उतराई

केला जगाचा उध्दार

राम वसे ठाई ठाई ॥६ ॥


ध्यानीमनी रघुवीर 

कर्तव्यनिष्ठा अंगी

तव नामात दंगुनी

राम पाहू अंतरंगी ॥ ७ ॥


    *कवयित्री*

   *सुवर्णा घोरपडे*

  संग्रामनगर-अकलूज 

ता.माळशिरस जि.सोलापूर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा