*श्रीपूर----बी.टी.शिवशरण.
रिपब्लिकन पक्षाचे चळवळीत आपले सर्वस्व झोकून देऊन राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले व प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे प्रेरणेने माळशिरस तालुक्यात आरपीआय आठवले गटाचे माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांचे नेतृत्व सामाजिक राजकीय वैचारिक परिवर्तनवादी विचारांची जबाबदारी स्विकारून पक्ष एकसंध ठेवण्यासाठी जीवाचे रान करणारे नेतृत्व अशी ओळख मिलिंद सरतापे यांनी निर्माण केली आहे अत्यंत शांत स्वभाव धडपडणारे कृतीशील नेतृत्व कार्यकर्त्यांना विश्वास देऊन गाव तेथे आरपीआय शाखा हा उपक्रम त्यांनी माळशिरस तालुक्यात सुरू केला अक्षरशः पायाला भिंगरी बांधून संपूर्ण माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गाव खेडे वस्ती शहरात गाव भेट दौरा त्यांनी यशस्वी केला या गाव भेटी दौऱ्याचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी सोलापूर जिल्हा आरपीआय कार्यकर्त्यांच्या जिल्हा बैठकीत विशेष उल्लेख करुन माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांचे कौतुक केले आहे ही मोठी शाबासकी त्यांना मिळाल्याचे ते आदराने बोलतात मिलिंद सरतापे यांनी माळशिरस तालुका अध्यक्षपद स्विकारले पासून आरपीआय आठवले गट हा पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी दिवसांचे बारा तास अठरा तास दिले आहेत असं म्हटले तरी वावगे होणार नाही कारण तालुक्यात एकशे बारा गावे वस्त्या वाडया आहेत संपर्क ठेवला आहे प्रत्येक कार्यकर्त्याला ते भेटतात भेटायला बोलावतात अनेक गावांतील खेड्यातील गटबाजी दोन गट यांच्यात समन्वय साधून दोन्ही गट एकत्रित कसे रहातील ही त्यांची प्रामाणिक भुमिका राहिली आहे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे ते कट्टर खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात पक्षाचे नावाला कुठेही कमी पणा येणार नाही यासाठी ते सदैव दक्ष असतात आरपीआय ची दरमहा मासीक बैठक तालुक्यात प्रत्येक गावात घेण्याबाबत ते आग्रही असतात एकही महिन्याची आरपीआय बैठक न चुकता ते घेतात पक्षाचे ध्येय संकल्पना धोरण विचारधारा कार्यकर्त्यां पर्यंत पोहचवली जाते दरमहा मिटिंग वेळेवर होत असते उशीरा येणार्या व सलग तीन बैठकीला गैरहजर रहाणारांना तालुका अध्यक्ष म्हणून ते त्याची अडचण गैरसोय विचारून समज देतात मुद्दाम न येणार्या तालुक्यातील पदाधिकारी यांना कडक इशारा दिला जातो प्रसंगी पक्ष शिस्तीची कारवाई केली जाते मिलिंद सरतापे यांनी माळशिरस तालुक्यात आरपीआय आठवले गट मजबूत व भक्कम स्थितीत स्थापन करण्यात पुढाकार घेतला आहे सरतापे यांच्याकडे संयम वक्तृत्व नेतृत्व आहे कार्यकर्ते जोडण्याची कला आहे ते जेवढे सोशीक शांत आहेत तेवढेच आक्रमक आहेत धडाकेबाज आहेत सरतापे यांनी माळशिरस तालुक्यातील आरपीआय कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली आहे प्रतिष्ठा मिळवून दिली आहे ते केवळ दलित बौद्ध समाजापुते मर्यादित नाहीत माळशिरस तालुक्यात सर्व जाती धर्म पक्ष संघटना यांच्या कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत त्यांचे ऋणानुबंध आहेत गावगाडयात त्यांना प्रतिष्ठित कार्यकर्ते म्हणून सन्मानाने बोलावलं जातं न्यायनिवाडा असो गावाचे विकासाचे प्रश्न असोत तसेच सांस्कृतिक आध्यात्मिक शैक्षणिक कार्यक्रमात त्यांना सन्मानाने बोलावले जाते गावाच्या वार्षिक यात्रोत्सवात अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली जाते आरपीआय पक्ष आंबेडकरी चळवळ गावगाडा नेतृत्व या बाबी तर आहेतच पण एवढ्या लहान वयात एवढी मोठी जबाबदारी नेतृत्व सहज पार पाडणया मागे त्यांचा सदाबहार स्वभाव प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे मार्गदर्शन आहे हे ते प्रामुख्याने कबूल करतात मिलिंद सरतापे यांच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक वैचारिक परिवर्तनवादी विचारांची बांधिलकी जपण्यासाठी आपण सर्व जण त्यांना साथ देऊन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे नेतृत्व भक्कम करण्यासाठी मिलिंद सरतापे यांना साथ देऊ या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा