Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २१ एप्रिल, २०२४

*"मोहिते पाटील ---जानकर" पॅटर्न ने भाजपा च्या कुट नीती ला जाळून टाकले....*

 


*ॲड--अविनाश.टी.काले,अकलुज*

 *ता.माळशिरस ,जि. सोलापूर*

  *मो;-9960 178 213


भाजपा हा असा पक्ष आहे , जो पक्ष या देशातील जनतेत धार्मिक , जातीय विद्वेष पेरतो , 

बहुजन समाजात फूट पाडून त्यांना एकमेकाच्या विरोधात लढाई साठी उभे करतो .

प्रस्थापित राजकीय पक्षातील नेत्यांचे कथित भ्रष्टाचारावर अंगुळी निर्देश करीत समग्र व्यवस्थेला व त्या पक्षाला ही बदनाम करतो , त्यांना धर्म विरोधी , राष्ट्र विरोधी ठरवतो .

आणि आपणच कसे राष्ट्र सर्व प्रथम , राष्ट्र सर्वतोपरी आहोत , त्यागी आहोत , आपणास भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा आहे, आणि तसा तो करायचा असेल तर हे सर्व भ्रष्ट पक्ष त्यांचे नेते यांना उचलून" डस्टबिन"मध्ये टाकून द्या , 

 काँग्रेस च्या चुकीच्या धोरणामुळे देशाची फाळणी झाली , चीन प्रगत झाला पण आपला देश मात्र मागे गेला , 60वर्ष सत्ता भोगणाऱ्या काँग्रेस ने काय केले? 



त्यांनी कांहीच घडवले नाही , आणि जे कांहीं घडवणार आहोत ते फक्त आम्हीच घडवू शकतो .

ब्रिटिशांनी देश सोडताना हिंदू महासभा ने हिंदू राष्ट्र निर्मिती ची घोषणा केल्याने , मुस्लिम लीग ने मुस्लिम राष्ट्राची मागणी केली , हा इतिहास आहे , द्वी राष्ट्र सिद्धांत यांनीच निर्माण केला आणि कायम स्वरुपी या देशात दोन धर्मातील तेढ जिंवत ठेवली गेली .

स्वात लढ्यातील काँग्रेस चां सहभाग हा इतिहासाचा भाग आहे आणि तो नाकारता येत नाही , गोखले , टिळक गांधी असा तो दीर्घकालीन प्रवास आहे , जन आंदोलनातून समग्र देश वासिय ब्रिटिश सत्ते विरोधात लढत असताना , लढत नव्हती ती फक्त 

आर एस एस .

त्यांचे हातात शस्त्र होते इतिहासाचे , ते देशातील लहान मुलांना घडवत होते , मुघलांचा इतिहास सांगत होते , या आक्रमणाने स्थापित झालेल्या राजवटी दरम्यान त्यांनी स्थानिक राज्याच्या विरोधात लढलेल्या लढाई ला , त्या लढाईत घडलेल्या अत्याचाराच्या कथा , स्त्री शोषण , त्यांनी फोडलेल्या किंकाळ्या याचे "करुण रसातील " कथा त्यांचे भांडवल राहिले , 

इतिहासातील युद्धाचा सूड आज घेऊ म्हणणारी डोकी त्यांनी निर्माण करण्यास सुरुवात केली ,, 

त्यांनी हे लपवले की "सती प्रथा " द्वारे लाखो स्त्रियांना जिंवतपणी पतीच्या चितेवर धडाडत्या अग्नी ज्वालात ढकलणारे हात कोणाचे होते ?

करोडो मागास वर्गीय , भटके विमुक्त यांना माणूस ही न मानणारे कोण होते ?

ग्रामीण भागात ग्राम पंचायत आल्या नंतर उजेडा साठी चौकात लाकडी खांबावर काचेच्या पेटीत तेलाचे दिवे जाळणारा देश , भाक्रा नांगल सारखी मोठी धरणे , आणि कोयना धरण ते जलविद्युत प्रकल्प निर्मिती , करून शेतीला , गावाला वीज पुरवणारी काँग्रेस त्यांना दिसलीच नाही .

स्वातंत्र्यानंतर अवघ्या 10/12वर्षा नंतर हरित क्रांती , धवल क्रांती , आणि सहकार चळवळ निर्माण करून साखर कारखानदारी , दूध संस्था , अंडी उत्पादक संस्था , शिक्षण संस्था खासगी आणि शासकीय ,,,, त्यांना कधी दिसल्या नाहीत .

 माणसे आणि घराणी एका रात्रीत मोठी होत नाहीत , त्या मागे मेहनत असते , ती त्यांना दिसण्याचे कारण ही नव्हते , 

ते व्यवस्थेतील दोष शोधत राहिले , 

मराठा विरुद्ध इतर सगळे असे तत्वज्ञान त्यांनी निर्माण केले , 

पण प्रत्यक्षात इतर समूहाच्या हातात आर्थिक उन्नती करू शकतील अशी व्यवस्था ते कधी निर्माण करू शकले नाहीत .

ज्यांचे आयुष्य झोळी वर अवलंबून होते त्यांच्या कडे श्रमा आधारित विकास करण्याची दृष्टी कशी विकसित होणार? 

त्यांनी ज्यांनी सहकार निर्माण केला , लोकांच्या हाताला काम दिले , त्यांच्या शिक्षणाची सोय केली त्यांना खलनायक , हुकूमशहा , जनतेचे शोषक ठरविण्यास सुरुवात केली , 

त्या त्या विभागातील गैर मराठा इतर मोठ्या जाती ना त्यांचे प्रतिस्पर्धी बनवले आणि ही झुंज चालू ठेवली , 

हे किमान 4 दशके प्रयोग चालू राहिले , 

लोकसंख्या बळाच्या आधारे समग्र तालुक्यातील तो समाज एकत्रित केला तरी दोन हजाराची ही पूर्ती करू न शकणारी "जात" या कुट नीतीने मराठा , धनगर , नवबौध्द अश्या सर्वांची मालक झाली .

ती पक्षा मुळे ,

तो पक्ष भाजपा , आणि त्याचे खरे मालक फक्त तेच , बाकीच्या जाती व त्यांचे नेते म्हणजे त्यांनी बनवलेले मोहरे .

प्रत्यक्षात जनतेचे पाठबळ , प्रेम , आणि आशिर्वादाचे सामर्थ्य लाभलेले मोहिते पाटील आणि जानकर हे वास्तवातील मालक पण त्यांना बौद्धिक गुलाम बनवले गेले आणि या नकली शक्तीच्या वर्चस्वा खाली त्यांचा प्रवास सुरु झाला ,,, 

पण या गुलामीचे मूळ कशात आहे ? ते आपले मालक कसे झाले? याचा शोध घेण्याची उर्मी उत्तमराव जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात निर्माण झाली.


ग्रीक विचारवंत थुसीडाईस यांचे प्रसिद्ध वाक्य आहे 

" मे बी युवर इंटरेस्ट टू बी अवर मास्टर ,

बट हावू कॅन इंटरेस्ट टू बी युवर स्लेव्ह,,"

याचा अर्थ असा होतो की ,

तुम्ही आमचे मालक बनणे तुमच्या हिताचे असेल ही ,,,, 

पण तुमचे गुलाम बनण्यात आमचे कोणते हित आहे?

आज माळशिरस तालुका या गुलामीतून बाहेर पडला , ही खरी क्रांती आहे , 

देशात या पॅटर्न ची सुरुवात होणे गरजेचे आहे ,  

लोकसंख्या बहुल असलेल्या दोन जाती समूहाची तालुका जिल्हा निहाय एकत्रीकरणा ची प्रक्रिया घडली तर 

ब्राम्हणी वर्चस्वातून , त्यांच्या मानसिक गुलामीतून मोठ्या जाती मुक्त होतील , 

त्यांच्या निर्णयाचे ते मालक असतील , ते ठरवतील ते उमेदवार असतील , व तेच राज्य ही चालवतील .

आपल्या स्वतः चे मालक स्वतः बनण्याची ही कृती आहे आणि ही क्रांती घडवणारे दोन नायक आहेत 

उत्तम राव जी जानकर साहेब 

आणि धैर्यशील जी मोहिते पाटील साहेब 

या दोन महा नायकांना माझा क्रांतिकारी सलाम 

कारण तुम्ही भाजपच्या कुट नीतीला चुड लाऊन तिला जाळून टाकले आहे ,, 

ब्राम्हणी कुट निती ने पासरवलेल्या अंधाराला भेदण्या साठी हातात मशाल घेऊन तुम्ही युद्ध जिंकले आहे , 

त्याचे स्वागत करण्यासाठी हातात तुतारी घेऊन माणूस उभा आहे ,, 

त्यावर मतदान करून आम्ही धैर्यशील भैय्या साहेब यांना खासदार 

करणारच आणि उत्तमराव जानकर साहेब यांना ही आमदार बनवणारच ,!

त्यांच्या जोडीला प्रणिती ताई यांना ही खासदार म्हणून दिल्लीला पाठवू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा