Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १० एप्रिल, २०२४

*अकलुज नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मागणी कडे केला कानाडोळा*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

या आठवड्यात गुढीपाडवा, रमजान ईद ,महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असून त्या अनुषंगाने अकलूज नगर परिषदेने सणासुदीच्या काळात एक दिवस आड पाणी सोडावे अशी मागणी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे सचिव जावेद भाई बागवान व अकलूज शहर बागवान जमात च्या वतीने मागील आठवड्यात अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना भेटून केली होती मात्र त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार न करता उलट मुख्याधिकाऱ्यांनी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापासून अकलूज चा पाणीपुरवठा चार दिवस आड केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे

 विशेषतः जवळच असलेल्या पंढरपूर नगर परिषदेने गुढीपाडवा रमजान ईद महात्मा ज्योतिबा फुले व डॉ ,बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एक दिवस आड होणारा पाणी पुरवठा दररोज पुरवठा केला जात आहे हेच या दोन्ही नगरपरिषद मधील फरक आहे वीर भाटघर धरणापेक्षा पंढरपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणात पाण्याची टक्केवारी कमी असून सुद्धा पंढरपूर नगरपरिषद एक दिवसात पाणी देत आहे मात्र अकलूज मध्ये मागील एक वर्षापासून तीन दिवस आड पाणीपुरवठा होत आहेआता तर चार दिवस आड पाणी सोडण्यात येईल अशी दवंडी देऊन नागरिकांचे हालहाल करत असून जनता पाण्यासाठी वणवण फिरत आहे धरणात पाणीसाठा असताना संपूर्ण वर्ष तीन दिवस आड पाणीपुरवठा केला जात असून उर्वरित पाणी कुठे मुरते हे न उलगडणारे कोडे आहे तरी अकलूज नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी उद्या साजरी होणाऱ्या रमजान ईद निमित्त व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एक दिवस पाणी पुरवठा करावा अशी मागणी ही जावेद बागवान यांनी केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा