Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २२ एप्रिल, २०२४

*सत्ताबदलाचा अंदाज आल्यानेच "एलन मस्क" यांचा भारत दौरा लांबणीवर..* *"काँग्रेस प्रवक्ते "अनंत गाडगीळ" यांचा दावा"*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


जगातील एक बडे उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनी आपला नियोजित भारत दौरा लांबणीवर टाकला आहे. आता ते निवडणूक झाल्यानंतर भारतात येणार आहेत. म्हणजे या निवडणुकीनंतर देशात सरकार बदलणार आहे, याचा अंदाज आल्यामुळेच एलन मस्क यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलला आहे फक्त देशातील जनतेलाच नाही, तर जगभरातील लोकांना मोदी पुन्हा येऊ शकत नाहीत, हे कळून चुकले आहे, असे माजी आमदार व काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना गाडगीळ म्हणाले की, दुसऱ्या एखाद्या देशात मोठी आर्थिक गुंतवणूक करण्या-या आंतरराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूक करण्यापूर्वी त्या देशातील आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करतात. काही कंपन्या तर सामाजिक परिस्थितीवरही लक्ष ठेवून असतात. या कंपन्यांच्या प्रमुखांच्या दौ-यांचे नियोजन कित्येक महिने अगोदरच केले जात असते. संबंधित देशात सत्तेवर कोणते सरकार असणार, हा एक कंपन्यांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असतो.

टेस्ला या प्रसिध्द कंपनीचे मालक एलन मस्क यांनी भारत दौरा आता लांबणीवर टाकला आहे. याचाच अर्थ भारतात निवडणुकानंतर सत्ता परिवर्तन होणार आहे, याचा त्यांना अंदाज आला आहे. देशातील जनतेलाही हा अंदाज आलेला आहे. कितीही ४०० पारच्या गप्पा मारल्या, तरी मोदी पुन्हा सत्तेवर येणार नाहीत. मोदी आणि भाजपचा पराभव निश्चित झालेला आहे.असे गाडगीळ म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा