*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात मोठी लढत पाहायला मिळणार आहे. कोल्हापूरचे विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे (शिंदे गट उमेदवार संजय मंडलिक यांना छत्रपती शाहू महाराज द्वितीय यांनी आव्हान दिलं आहे.
शाहू महाराज काँग्रेसच्या तिकीटावर कोल्हापूरमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. दोन तुल्यबळ उमेदवारांमधील ही लढत रंगतदार होणार आहे. दरम्यान, कोल्हापुरात शाहू महाराजांची ताकद वाढली आहे. कारण या मतदारसंघात महाविकास आघाडीतले सर्व पक्ष शाहू महाराजांबरोबर आहेतच. त्यांच्याबरोबर इतर लहान मोठे पक्षदेखील (जे महायुतीत नाहीत) शाहू महाराजांबरोबर आहेत. अशातच एका मोठ्या पक्षाने शाहू महाराजांना पाठींबा दर्शवला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे.
एआयएमआयएम पक्षाचे छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) खासदार इम्तियाज जलील यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे. जलील यांनी छ. संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी खासदार जलील म्हणाले, शाहू महाराज किंवा मविआने आमच्याकडे पाठिंब्याची मागणी केली नव्हती. मात्र आम्ही स्वतःहून या निवडणुकीत त्यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा