*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
शरद पवार यांना कॅन्सर सारखा आजार झाल्याचे समजल्यानंतर शरद पवार यांचे कट्टर विरोधक असलेले स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांना
१५ नोव्हेंबर, २००६ रोजी लिहिलेले पत्र म्हणजेच हा पुरोगामी महाराष्ट्राचे उत्तम उदाहरण होय त्याकाळी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे एकमेकांवर टीका करायचे मात्र ते राजकारणापुरतेच तेंव्हा ही टीका तत्वाची असायची परंतु हल्लीच्या काळात सत्ताधारी ज्याप्रमाणे विरोधकांना छळण्याचे काम किंवा त्यांच्या बाबत द्वेषाचे राजकारण करत आहेत ते केवळ सत्तेत असल्यामुळे विरोधकांना ईडी ,सीबीआय ,इत्यादींची कारवाई करून जेलमध्ये टाकण्याचे काम सत्ताधारी करत आहेत हे काम पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नसून सत्ताधारी आणि विरोधक यांनी बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांची अनुकरण करणे काळाची गरज असून पुरोगामी महाराष्ट्राचे पायमल्ली करणे ही महाराष्ट्र आणि देशासाठी धोक्याची घंटा आहे पहा बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार हे आजारी असताना लिहिलेले पत्र
आदरणीय शरदचंद्रजी पवार कृषी, अब व नागरी पुरवठा मंत्री, हिन्दूस्थान सरकार, नवी दिल्ली
प्रिय शरदबाबू यांसी
जय महाराष्ट्र!
आपण केंद्र शासनात कृषिमंत्री या पदावर विराजमान आहात. तरीपण हे पद बाजूला सारून आपल्याला मी माझे जुने मित्र शरदबाबू या नावानेच विचारणार आणि बोलणार. आपण बरे झालात है ऐकून बरे वाटलेः परंतु वडीलधाऱ्या अधिकाराने आम्ही आपल्याला आदेश देत आहोत की, यापुढे अरा वणवण कमी करा. झेपेल तेवढे जरूर करा ! पण अलीकडे आपला दौऱ्यावर जाण्याचा सुकाळ शाला होता. वाकडचातिकड्या मार्गाने आपण दौरे करीत होता. परदेश दौऱ्यांतही कोठे कमतरता नव्हती. आपल्या पक्षाची निशाणी जरी घडधाळ असली तरी आणि त्या घड्याळाचे काटे जरी स्थिरावले असले तरी आपल्या आयुष्याचे घड्याळ टिक टिक करीत त्याचे काटे पुढे सरकतच असतात है विसरू नये.
सोनियाच्या 'कथली' राजवटीत आपण अन्न व शेती मंत्री आहात. सध्याच्या परिस्थितीत हे महत्वाचे खाते आपण सांभाळीत आहात. त्यामुळे फक्त महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आपली गरज आहे. पुन्हा बजावतो, महाराष्ट्राला तर आपली नक्कीच गरज आहे; परंतु देशाची भयानक अवस्था पाहिल्यावर आपल्यासारख्याची देशाला नितांत गरज आहे. त्यामुळे स्वतःसाठी नसले तरी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी तुम्हाला जगावेच लागेल. त्याप्रमाणे वागणूक ठेवावी व प्रकृतीची काळजी घ्यावी.
कळावे,
आपला नम्र,
(बाळ ठाकरे) शिवसेनाप्रमुख
*ताजा कलम ;--आपण घरी आल्यावर हितचिंतकांच्या झुंडीच्या झुंडी आपल्या दारावर आदळतील त्यांना आवर घालावा।*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा