*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार अमित भैय्या देशमुख ,४०- उस्मानाबाद धाराशिव महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओम दादाराजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडी कार्यकर्ता बूथ मेळावा संपन्न झाला
संपूर्ण औसा तालुक्यातून महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने आणि पूर्ण ताकतीने काम करण्याचा संकल्प यावेळेस केलेला आहे. एक गाव निहाय आणि बूथनिहाय जास्तीत जास्त मतदान 'मशाल 'या चिन्हावर करून घेण्याची जबाबदारी यावेळेस घेण्यात आली.
राजकीय परिस्थिती बदललेली असली तरी सुद्धा याही परिस्थितीमध्ये औसा तालुका प्रचंड लीड साठी काम करत आहे आपल्या सर्वांचा उत्साह आणि परिश्रम यांचे नक्कीच चीज होईल.
यावेळी माजी आमदार दिनकरराव माने साहेब, काँग्रेस जिल्हाध्यक्ष लातूर श्रीशैल आप्पा उटगे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष लातुर संजय शेट्टे, काँग्रेस नेते श् अमर खानापुरे, सहसंपर्क प्रमुख संतोष सोमवंशी, माजी अध्यक्ष जिल्हा बँक लातुर श्रीपतराव काकडे, आप्पासाहेब पाटील, जेष्ठ नेते काँग्रेस शेषराव पाटील, चेअरमन शाम भोसले, अभय दादा साळुंखे काँग्रेस प्रवक्ते लातुर, सचिन पाटील व्हाईस चेअरमन, युवराज पाटील राष्ट्रवादी नेते, रामदास चव्हाण - माजी जि.प.सदस्य लातुर, शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन पठाण, नारायण आबा लोखंडे माजी उपाध्यक्ष जि.प.लातुर, दत्तोपंत सुर्यवंशी तालुका अध्यक्ष काँग्रेस, उपसभापती किशोर जाधव, भरत सुर्यवंशी युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी लातुर, संतोष सुर्यवंशी उपजिल्हा प्रमुख शिवसेना, उपजिल्हाप्रमुख बजरंग दादा जाधव, शेखर आण्णा चव्हाण, दिनेश जावळे जिल्हाप्रमुख युवासेना लातुर, जयश्री ताई उटगे जिल्हा महिला संघटक लातुर, रवि कोरे, मंजू ताई हजारे, सुरेश पवार, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा