Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ९ एप्रिल, २०२४

*सर्व पक्षांना मुस्लिमांची फक्त मते हवेत --मात्र सत्ता स्थापनेत वाटा नको हे चित्र आता बदलायला हवे--- इकबाल मुल्ला*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

मुस्लिमांनी फक्त मते द्यायची. राजकीय पक्षाचे तिकीट मात्र दुसऱ्याला..! मुस्लिमांवर असा वारंवार भेदभाव का ???

निवडून येण्यासाठी अल्पसंख्यांक मुस्लिम मतदार पाहिजे परंतु निवडणुकीत प्रतिनिधित्व "अन्य" उमेदवाराला, असे का ??

15% एकगठ्ठा* मुस्लिम मतदार प्रस्थापितांना धक्का देत ,सत्ताधाऱ्यांचे साम्राज्य उध्वस्त करू शकतो. परंतु काँगेस- भाजपा सह सर्व "बलाढ्य" राजकीय पक्षांची तशी "मानसिकता" नाही. इफ्तार पार्टी साठी मुस्लिम लागतात, धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी, धर्मनिरपेक्ष राजकारणाचे "नाव" घेत "मते" घेण्यासाठी मुस्लिम लागतात, परंतु समाजकारण आणि राजकारण यामधील दुवा बनण्यासाठी मुस्लिम नको ..ही राजकारण्यांची मानसिकता "अस्वस्थ" ठरत आहे . कार्यकर्त्यांनी नेत्यांचे पायपुसणे व्हायचे ,आणि "लाभार्थी" "दुसरे" असे का ??? कार्यकर्ते देखील "नेते" होऊ शकतात ,परंतु ती संधी प्रस्थापित राजकीय पक्ष देत नाहीत ही शोकांतिका आहे .



भविष्यात मुस्लिमाना प्रतिनिधित्व न देता होणारे राजकारण "धोक्याची घंटा "दर्शवित आहे . याचे दुरोगामी परिणाम असतात व ते "अदृश्य" स्वरुपात असतात .

 महाराष्ट्रात काँग्रेससह भाजपा हे "बलाढ्य पक्ष" मुस्लिमाना उमेदवारी देण्यास का घाबरतात ??? खरंच हा यक्षप्रश्न आहे . महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित ने केवळ मुस्लिमाना "तिकीट" देऊन "समतोल" साधला आहे. अन्य कुठल्याही पक्षाने मुस्लिम उमेदवार दिला नाही ही वस्तुस्थिती आहे .



महाराष्ट्रातील मिरज येथे स्व. हाफिज धत्तुरे हे बहुतांशी मुस्लिम - बहुजन आणि "सर्वधर्मिय" मतदानाद्वारे 2 वेळा विधानसभा आमदार झाले होते. येथे "एकगठ्ठा" मुस्लिम मतदान त्यांना झाले.आणि "चमत्कार " घडला . तात्पर्य कोणत्याही राजकीय पक्षाने मुस्लिमाना प्रतिनिधित्व दिल्यास एकगठ्ठा मतदान मिळू शकेल,व तो उमेदवार निवडून येऊ शकतो ही वस्तुस्थिती आहे.

 मुस्लिम मतदानाच्या टक्केवारीचा विचार करता ,संपूर्ण भारतात किमान मुस्लिम "40 खासदार "निवडून येऊ शकतात . असो , 

सांगलीत बहुजन - मुस्लिम आणि हिंदू बांधवांमध्ये "सर्वधर्मसमभावाचा" सेतू बांधणारे "असिफ बावा" नामक एक "नेतृत्व" फुलत आहे . "अडीअडचणीच्या" काळात सदैव "तत्पर" अशी त्यांची ओळख "अधोरेखित" आहे. एक लोकप्रिय "धूर्त - धाडसी "आणि स्वछंदी "समाजकारणी" म्हणून त्यांचा सांगलीत "नावलौकिक" आहे. आगामी विधानसभेसाठी काँग्रेस अथवा अन्य कुठल्याही राजकीय पक्षाने "असिफ बावा" यांचा विचार केला तर "15%" एकगठ्ठा मुस्लिम आणि सर्वपक्षीय मतदानाद्वारे ते विधानसभा निवडणुकीत निश्चित "आव्हान" देऊ शकतात, व भविष्यात आमदार होऊ शकतात. परंतु अशाप्रकारे एखाद्या -प्रस्थापित नावं नसलेल्या उमेदवाराला तिकीट देण्याचे "धारिष्टय" कोणता पक्ष दाखवेल का ??? आडनाव "पाटील नसणारे पण भविष्यात "आमदार" होऊ शकतात. परंतु त्यासाठी राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाकडे प्रचंड "इच्छाशक्ती " हवी ,आणि निकोप दृष्टीकोन हवा. तेंव्हाच हें शक्य आहे .



मुस्लिमांची फक्त मते हवीत आणि सत्तास्थापनेत वाटा नको ..हे चित्र आता बदलायला हवे. यासाठी मोठे प्रबोधन व्हायला हवे . 15% एकगठ्ठा मतदान परिवर्तन करू शकतो हें निश्चित. धन्यवाद ! 


 *इकबाल बाबासाहेब मुल्ला*

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध ,

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा