Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ९ एप्रिल, २०२४

*माळशिरस तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात रंगली इफ्तार पार्टी* *शिक्षकांनी घडवले राष्ट्रीय एकात्मतेचे व सर्वधर्म समभावाचे दर्शन*

 


*अकलुज---प्रतिनिधी*

*केदार ---लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी


रमजान महिन्यातील सर्वाधिक महत्वपूर्ण समजला जाणारा २७ व्या रोजाचे औचित्य साधून माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक मंडळ,स्वाभिमानी शिक्षक परिवार आणि माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक संघ व महिला आघाडीच्या वतीने मुस्लिम शिक्षक बंधू भगिनींसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले गेले. 



          पतसंस्थेच्या इतिहासात प्रथमच आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये बहुसंख्य मुस्लिम शिक्षक बंधू भगिनी सहकुटुंब उपस्थित होते.प्रथम संयोजकांच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.फलाहारानंतर मुख्याध्यापक जनाब हमीदभाई मुलाणी त्यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण झाले.पतसंस्थेचे चेअरमन अशोक पवार यांनी स्वागतपर मनोगतातून सांगितले की,संस्थेने सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण ऐतिहासिक उपक्रमाचे औचित्य विशद केले. सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आणि अभ्यासक व्याख्याते सुहास उरवणे यांनी मुस्लिम-रमजान -नमाज विषयांची सांगड घालताना अभ्यासपूर्ण आणि अस्खलित हिंदी उर्दूमध्ये विवेचन केले.जनाब युनूस तांबोळी, शहजादी काझी यांनी संस्थेने राबविलेल्या अभूतपूर्व उपक्रमाचे स्वागत केले.अल्पसंख्यांक परिवाराच्या वतीने इफ्तार पार्टी संयोजकांचा सत्कार संपन्न झाला. शुद्ध शाकाहारी सहभोजनाने इफ्तार पार्टी संपन्न झाली.



           यावेळी जिल्हा शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष दिलीप ताटे, एकल मंचचे जिल्हाध्यक्ष इकबाल नदाफ,अल्पसंख्यांक संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष मिनाज मुलाणी,रमजान शेख,युनूस तांबोळी,तालुकाध्यक्ष अशपाक मुलाणी,संस्थेचे व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर मिसाळ,संचालक राजेंद्र उकिरडे,राम काटकर,पांडुरंग मोहिते,अमोल नष्टे,बाळासाहेब शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी श्रीमंत गुंड,अनिल अन्नदाते,मनोहर एकतपुरे उमाजी माने,रमेश सरक,शहाजी काशीद, राजकुमार ठोंबरे,विजय भोसले, दगडू पवार,राजाराम गुजर,संग्राम दळवी,सुरेश कुंभार,राजेंद्र जाधवर,विलास जगदाळे,विनोद थोरात,संजय करमाळकर,सुरेश भोसले,राजू गोरवे,सचिन बरडकर,राजेंद्र जाधवर,महिला प्रतिनिधी सायरा मुलाणी,संध्या माळी,प्रतिभा मोहिते,मीना पाटील आदी उपस्थित होत्या.इफ्तार पार्टीच्या आयोजनामध्ये अल्पसंख्यांक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.




*माळशिरस तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात जिथे दिवाळी पहाट गाण्यांचे सूर उमटले तिथेच रमजान महिन्यांमध्ये इफ्तार पार्टीचे नमाज पठण झाले.हे संयोजकांचे विधायक, ऐतिहासिक कार्य व धोरण आहे.*



         सुहास उरवणे

अभ्यासक आणि व्याख्याते

.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा