इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकनिष्ठ व निष्ठावंतांना महत्त्व असून विकास कामांना प्राधान्य देणाऱ्यांना पक्षात मानाचे स्थान आहे. मात्र पक्षात येवून व्यक्तीगत स्वार्थ व कोणत्याही प्रकारच्या खोडसाळपणा करणाऱ्यांना जागा नसून तसा प्रकार खपवून घेतला जात नसल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे यांनी केले.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद मतदार संघामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच प्रचार दौरा काढण्यात आला होता.
आण्णासाहेब कोकाटे बोलताना पुढे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विकासाभिमुख कार्यशैलिस अनुसरून अनेक विकासाची कामे मतदार संघामध्ये करण्यात आली आहेत. त्याच पद्धतीचा विकास यापुढील काळात करावयाचा असल्यास सुनेत्रा वहिनी पवार यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच पक्षात एकनिष्ठेने काम करणाऱ्यांनाच स्थान असून कोणतेही व्यक्तिगत स्वार्थ व जाणिवपूर्वक खोडसाळपणा करणाऱ्यांना पक्षात स्थान दिले जात नाही.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या काम करण्याची पद्धती जगजाहीर असून सार्वजनिक हिताच्या कामांना प्राधान्य देणाऱ्यांना पक्षात मानाचे स्थान देण्यात येते. तसेच आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विकास कामांचाही वसा घेवून यापुढे कामे करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा