उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स ४५ न्युज मराठी
मी देशाचा ,हा देश माझा अभिमान
आहे देशभक्ती हृदयी, रक्तात माझ्या इमान
लढले पूर्वज माझे देशासाठी
दिले बलिदान
वागणूक सावत्रपणाची मग का सोसतो मुसलमान
माझ्या देशभक्तीचे का द्यावे मी वारंवार प्रमाण .
आरक्षण हक्क शिक्षणापसुन
का वंचीत मुसलमान
आवाज उठवता होई गद्दार
देशभक्त मुसलमान
होय मी देशभक्त म्हणून गिळतो वारंवार अपमान .
मी भारतीय मुसलमान हिच माझी जगी पहचान
तिरंग्यासाठी लढलो , लढणार
तिरंगाच आमची आण बाण शान .
नूरजहाँ फाकृद्दीन शेख
गणेशगांव ता. माळशिरस
जी सोलापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा