Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

*अकलूज येथे नगरपरिषदेच्या वतीने ( SVEEP )कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती सायकल रॅली संपन्न*

 


*विशेष ----प्रतिनिधी*

 *एहसान ---मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9096 837 451*


गुरुवार दि.18 एप्रिल 2024 रोजी सकाळी अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी तथा (SvEEP) नोडल अधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज नगरपरिषद हद्दीतून सकाळी ठीक 7.00 वाजता अकलूज नगरपरिषद कार्यालय येथून सायकल रॅलीस प्रारंभ करण्यात आला.




सध्या चालू असलेल्या 43- माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार टक्केवारी वाढावी म्हणुन SVEEP कार्यक्रमा अंतर्गत आज हि मतदार जनजागृती सायकल रॅली घेण्यात आली. अकलूज नगरपरिषद कार्यालय येथून सुरुवात करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कर्मवीर चौक,शिवाजीनगर बायपास मार्गे, माळेवाडी कॉलेज, संत सावतमाळी चौक येथून परत माळेवाडी कॉलेज, प्रतापसिंह चौक, सदुभाऊ चौक, गांधी चौक मार्गे विजय चौक, शिवसृष्टी किल्ला आणि अकलूज नगरपरिषद कार्यालय येथे येऊन सर्वांना मतदार जनजागृती शपथ देऊन समारोप करण्यात आला. यामध्ये अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी तथा नोडल अधिकारी (SVEEP ) दयानंद गोरे ,. राजाराम नरुटे, बाळासाहेब वाईकर,. सुनिल काशिद व सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा