Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १३ एप्रिल, २०२४

"*विक्रम"गर्दीचा असावा-माञ धार्मिक "उन्माद" व सर्वधर्म समभावाच्या पविञ अर्थाला "काळिमा" फासणारा नसावा!---इक्बाल मुल्ला--,सांगली*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

"विक्रम" गर्दीचा असावा ,विक्रम धार्मिक "उन्माद "वाढवणारा नसावा , सर्वधर्मसमभाव" च्या पवित्र अर्थाला "काळिमा" फासणारा नसावा. प्रचंड पावसाचे विक्रम हें ,शांत सुखांच्या "सरी" प्रमाणे ,आठवणीत रमणारे ,मातीला भिजवून ,मातीशी इमान राखून सर्वांना "सुगंध" देणारे असावेत, ते 

जातीयवाद पसरवून "मानवतावादी" संस्कृती पायदळी तुडवणारे नसावेत.



पुसेसावळी प्रकरण "लाजिरवाणे" आणि मानवतावादी विचारांशी "प्रतारणा" करणारे होते. धार्मिकतेच्या उन्मादापेक्षा "सर्वधर्मसमभावाचा" वसा मानवसृष्टीसाठी हितावह ठरावा. सर्वांच्या रक्ताचा "रंग" एकच असेल तर मग सर्वधर्मिय बांधव आपले बंधू चं झाले ना ??? मग हिंदू -मुस्लिमांमध्ये अघोरी "भिंत" घालणाऱ्या या "जातीय शक्तींला" रोखायला नको का ???



"रमजान ईद " या पवित्र दिवशी सर्व हिंदू -मुस्लिम आणि समस्त "विश्वासाठी" मुस्लिम बांधवांकडून "प्रार्थना" करण्यात येते. करोडो लोकांचा समूह "शिस्त" पाळत, नमाजपठण करून आलेल्या मार्गाला प्रयाण करतो . मुस्लिमांविषयी पसरवलेला द्वेष आणि खरे वास्तव -"वस्तुस्थिती" हें "सूर्यप्रकाशाइतके" स्पष्ट करणारे आहे .

 "शांतीचे प्रतीक" आणि मानवतावादी दृष्टीकोन "सजग" करणारा मुस्लिम समाज खऱ्या अर्थाने शांतीचे "दूत" आहेत .

प्रक्षोभक भाषण करणे आणि सार्वजनिक ठिकाणी सर्व भारतवासीयांसाठी मुस्लिम बांधवांकडून " विश्वप्रार्थना करणे यात जमीन - आसमान चा फरक असतो. 

हिंदू -मुस्लिम बांधव आणि त्यांचा सांस्कृतिक मिलाफ याला "बाहेरील" जिल्ह्यातील - अन्य राज्यातील कोणी आपल्या कूटनीतीने - जातीयवादाने "तडा" देण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करणे हितावह ठरते. भविष्यात सर्वधर्मसमभाव ला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर प्रतिबंध लावणे अत्यावश्यक आहे .

मुस्लिमांच्या "ईद"चा जनसागर शांती, एकोपा, सदभावतेचा संदेश देतो. 

 "मेरा भारत महान" हाच नारा देतो. 

धन्यवाद ! 

*इकबाल बाबासाहेब मुल्ला*

 (पत्रकार)

संपादक - सांगली वेध ,सांगली.

संपादक - वेध मीडिया न्यूज, सांगली .

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा