Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १३ एप्रिल, २०२४

**आशा रूपा परभणीकर" संगीत पार्टीचे वाजणार छम- छम -छम...*

 


*संजय लोहकरे*

*टाइम्स 46 न्युज मराठी


मोडनिंबच्या लावणीची जगाला भुरळ


संग्रामनगर दि.१२ (संजय लोहकरे यांजकडून)

महाराष्ट्राची लावणी आता साता समुद्रापार वाजू लागली असून या लोककलेला जगाची मान्यता मिळताना दिसत आहे. अमेरिकेनंतर आता दुबईत आशा,रूपा परभणीकर संगीत पार्टी,नटरंग कला केंद्र मोडनिंबची लावणी वाजणार आहे.



       दुबई टुरिझम यांचे वतीने दुबई येथे भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये बेली डान्स,बॉलीवूड डान्स,नुरा डान्स यासोबतच महाराष्ट्राच्या लोककलेची प्रतीक असलेली पारंपारिक लावणी देखील सादर होणार आहे. यासाठी दुबई टुरिझमच्या वतीने मोडनिंब येथील आशा रूपा परभणीकर संगीत पार्टी,नटरंग कला केंद्र मोडनिंबची निवड करण्यात आली असून या अगोदर या कला केंद्राने तत्कालीन सांस्कृतिक मंत्री विजयसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्याच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त अमेरिका येथील न्यूयॉर्क शहारात आपली लावणी सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली होती.मागील पंचवीस वर्षापासून या कला केंद्राने महाराष्ट्राची लावणी जतन करण्यासाठी आणि तिचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केलेली आहे. विविध पुरस्कार या कला केंद्राला आजपर्यंत मिळालेले आहेत. यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह केंद्र शासनाचे देखील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.महाराष्ट्राची पहिली लावणी सम्राज्ञी व सिने अभिनेत्री वैशाली जाधव यांच्या मार्गदर्शना खाली या कला केंद्राने लावणीला नावारुपाला आणलेली आहे. हयात इंटरनॅशनल येथे १८ एप्रिल रोजी दुबई येथे होणाऱ्या या कार्यक्रमात वैशाली जाधव,रूपा जाधव परभणीकर,दिपा जाधव परभणीकर व सहकलाकार ऐश्वर्या जाधव,काजल जाधव हे कलाकार आपली लावणी सादर करणार आहेत तर त्यांच्यासोबत नृत्य दिग्दर्शक योगेश देशमुख, पार्श्वगायिका प्राजक्ता महामुनी, ढोलकी पटू राहुल जावळे,पेटी मास्तर अमोल पांढरे ,सोमो डान्स अकॅडमीचे राहुल सर आदी कलाकारांची साथ मिळणार आहे.



*चौकोट*

*मोहिते पाटलांचे योगदान..*

*लावणीला खऱ्या अर्थाने मोहिते पाटील कुटुंबाने मान सन्मान मिळवून दिला असून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे अमेरिकेत लावणीचा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली त्याचबरोबर चित्रपट व रियालिटी शो मध्ये जयसिंह उर्फ बाळदादा यांनी लावणी कलाकारांना नेहमीच संधी देऊन प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्यामुळेच आज साता समुद्रापार लावणी पोहोचताना दिसते आहे.त्यामुळे मोहिते पाटील कुटुंबाचे आभार आणि डॉ.प्रकाश खांडगे,किसन आप्पा जाधव,सरलाताई व पंचफुलाताई नांदुरेकर यांचेही योगदान या कामी राहिले आहे त्यामुळे त्यांचेही विशेष आभार... त्याचबरोबर मायबाप प्रेक्षकांनी कलेला भरभरून दाद दिली आहे त्यामुळे दुबई येथे कार्यक्रम करताना महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवण्याचे मनात आहे व ही आमच्यासाठी मोठी सुवर्णसंधी आहे.*

वैशाली जाधव,सिने अभिनेत्री


*चौकोट*

*आमच्या परभणीतील जाधव घराण्याने नेहमीच पारंपरिक लावणीची परंपरा कायम ठेवली आहे. लावणीला पुढे नेण्यामध्ये मोहिते पाटील घराण्याचे योगदान राहिले आहे.पारंपारिक लावणी जिवंत राहण्यासाठी नवीन कलाकारांनी योगदान दिले पाहिजे. दुबई येथे कार्यक्रम करत असताना पूर्वजांचे परिश्रम विसरून चालणार नाही. त्यांच्यामुळेच आज हा लावणीचा रथ दुबईपर्यंत पोहोचला आहे. याचा सार्थ अभिमान आहे यामध्ये सर्वांचे योगदान आहे आहे त्या सर्वांचे आभार.* 

  रूपा जाधव परभणीकर

      लावणी कलाकार


*चौकोट*

*कौतुकास्पद भरारी...*

*लावणी कला जतन करण्यासाठी अनेक कलाकारांनी या कामी योगदान दिले आहे हे होत असताना दुबई येथे लावणी पोहोचणार आहे याचा सार्थ अभिमान सर्व स्तरातून व्यक्त होताना दिसत आहे त्यामुळे या दौऱ्यात जाणाऱ्या कलाकारांचे सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने या सर्वच कलाकारांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा