Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २० एप्रिल, २०२४

*आला कडक उन्हाळा*

 


🌞*उन्हाळा*🌞


येता ऋतू हा उन्हाळा 

कासावीस होतो जीव

 ऊन येता डोईवरी

शोधे सावली सजीव ॥१


तृष्णा तहान भागवी

माठातील थंड पाणी

ऋतू वसंत येण्याने

वसुंधरा गाते गाणी ॥ २ ॥


कशी निसर्ग किमया

कधी वारा कधी गारा 

साऱ्या जिवांचे ते हाल

कसा नशिबी पसारा ॥ ३ ॥


खार लोणचे पापड

स्त्रिया घरोघरी करी

अन्नधान्य कडधान्य

वाळवण डबे भरी ॥ ४ ॥ 


शुभ्र धवल मोगरा

पानोपानी हिरवळ

मन मोहक सुगंध

अंगणात दरवळ ॥५ ॥


सुट्टी लागता उन्हाळी

 पूर्व नियोजन होई

चार दिस आनंदाचे

नको ताण भार डोई ॥६ ॥ 


घेऊ आरोग्य काळजी

नको मनी उष्मा खंत

सिंमेटच्या जंगलात

निसर्गाचा नको अंत ॥७ ॥


होता सूर्याचा प्रकोप 

उसळते किती धग 

अंगाची ती लाही लाही

जीवाची रे तगमग ॥८ ॥


बर्फगोळा आईस्क्रीम

मना समाधान देई

राजा फळांचा तो आंबा

आपल्या भेटीस येई ॥ ९ ॥


तप्त कडक उन्हाळा  

 नको सूर्या ठेवू नावं 

 निसर्गात रमताना

एक तरी झाड लाव ॥१० ॥


      *कवयित्री*

   *सुवर्णा घोरपडे*

 संग्रामनगर-अकलूज 

या.माळशिरस जि.सोलापूर




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा