Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ९ एप्रिल, २०२४

*माळीनगर येथील "शाहिस्ता फैयाज काझी " हिचे(वय-६वर्ष) संपूर्ण महिन्याचे रोजे पूर्णत्वाकडे*

 


*अकलुज ----प्रतिनिधी*

*शकूर --तांबोळी*

*टाइम्स 45 न्युज मराठी


मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र मानला जाणारा रमजान ईद हा सण जवळ आल्याने. सगळीकडे धार्मिक वातावरण तयार झाले आहे तसेच रोजाचा महिना सगळीकडे साजरा होताना दिसत. रोजाच्या महिन्यात उपवास धरण्याची प्रथा आहे पहाटे सुर्य उगवण्याच्या आगोदर सहेरी करायची आणि दिवस मावळल्यावर उपास सोडून नमाज पडली जाते अशी या दिवसात दिनचर्या असते. असा १४ तासाचा उपवास या दिवसात महिनाभर केले जातात. बघायला गेलं तर हे उपवास अगदीच कडक मानले जातात. 



माळीनगर ता. माळशिरस येथील ६वर्षे वयाच्या "शाहिस्ता फैयाज काझी "या चिमुकलीने आतापर्यंत २६ दिवस रोजे (उपवास )केले आहेत. आणि पुढील देखील 30 रोजे ती पुर्ण करणार असल्याचे वडील "फैय्याज काझी"यांनी सांगितले. या उपवासाच्या निमित्ताने माळीनगर-सवतगव्हाण मस्जिद माळीनगर यांच्या वतीने चिमुकल्या शाहिस्ताचा- सत्कार करण्यात आला. 

            यावर्षी हे उपवास कडक उन्हाळ्यात आल्याने उपवास धरणे कठीण आणि जिकरीचे जात असल्याचे मुस्लिम बांधव सांगतात. त्यामुळे उन्हाळ्याचा परिणाम या उपवासावर झालेला दिसून येतो असे असले तरीही श्रद्धावान लोक हे उपवास कितीही अडचणी आल्या तरी धरत असल्याचे ही सांगितले. 

         या पवित्र सणाच्या निमित्ताने सगळीकडे ईफ्तार पार्टींचे आयोजन केले जात असून काही ईफ्तार पार्ट्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रंग चढू लागले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा