इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- दुष्काळ निधी वाटपाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्याचे काम गावोगावी सुरू आहे. पिंपरी बुद्रुक येथील आपले सरकार सेवा केंद्रात शेतकऱ्यांच्या सेवार्थ मोफत ई-केवायसी करण्यात येत आहे.
सध्याला सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून त्यातच अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी व सुलतानी संकट उभा ठाकले आहे. शेतकऱ्यांना सध्या कोणीही वाली नाही त्यांच्यावरती नैसर्गिक संकट, पाणीटंचाई, लाईटचे संकट अशा अन्य संकटावर मात करत शेतकरी कसाबसा मात करत आहे. त्यातच ईतरत्र ई-केवासी करीता १०० रूपये घेतले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सेवार्थ म्हणून सदर केंद्राचे चालक समाधान शेंडगे यांनी छोटासा प्रयत्न म्हणून मोफत ई-केवायसी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचा हा शेतकऱ्यांच्या मदत साठी केलेला प्रयत्न सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. त्यातच ते अपंग असून सर्वांना मदतीचा हात दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांना मोफत ई-केवायसी करण्याचा लाभ.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा