*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
आज 13 एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारुळ येथे काक्रंबा केंद्रस्तरीय शाळापूर्व मेळावा साजरा करण्यात आला. या मेळाव्यात काक्रंबा बिटचे विस्ताराधिकारी मल्लिनाथ काळे साहेब, केंद्रप्रमुख लोखंडे श्रीहरी साहेब तसेच शा.व्य. स. अध्यक्ष मन्मथ ठोंबरे,सदस्य .रणजित सगर , काकराम बाकींद्रातील सर्व घटक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका उपस्थित होते.कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून बिटचे विस्ताराधिकारी काळे साहेब, अणदूरकर सर, लोखंडे सर ,.खडके सर या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि शाळेच्या वतीने पुस्तिका भेट देण्यात आली. केंद्रप्रमुख लोखंडे सर शाळापूर्व मेळाव्याबद्दल मार्गदर्शन केले. शाळा पूर्व तयारी मेळाव्याची रूपरेषा सविस्तर स्पष्ट करून सांगितली.त्याचप्रमाणे .विस्तराधिकरी, मल्लिनाथ काळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणसाठी सुलभक म्हणून मुलाणी सर यांनी या कार्यक्रमाचे एप्रिल ते जून या कालावधीत विविध उपक्रमाचे आयोजन कसे करावे,निपुण माता पालक गटाची नोंदणी कशी करावी ,विविध व्हाट्सअप लिंक कशी भरावी, पहिले पाऊल या चॅनलला कसं पाहावे याबाबत सविस्तर माहिती सांगितली. सुर्वे सर यांनी संपूर्ण सात प्रकारचे स्टॉल ला कसे लावावे व प्रत्येक स्टॉल काय कामकाज पाहावं याची माहिती प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवली विकास पत्र कसे भरावे शाळेने कधी मेळावा आयोजित करावा याचा अनमोल असे मार्गदर्शन केले.या प्रसंगी शाळेचे मुख्यध्यापक पवार सर ,सारणे सर ,मुलानी सर , मोरे मॅडम , राजगुरू मॅडम सर्व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन सारने सर यांनी केले तर आभार प्रदर्शन काळे सर यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोरे मॅडम व राजगुरू मॅडम यांनी परिश्रम घेतले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा