*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अकलूज, शंकरनगर येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर,अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि.६ व ७ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (मॉक टेस्ट) संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी दिली .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी प्रास्तविक केले. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, वेळेचा सदुपयोग केला तर यश अवघड नाही. तसेच महाविद्यालयात मोफत ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी सोय करण्यात येणार आहे असे सांगितले. त्यानंतर आदरणीय माजी उमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व संस्थेचे संस्थापक विजयसिंह मोहिते-पाटील, संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात असे अनेक विविध उपक्रम होत आहेत असे प्रतिपादन प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले, व सहभागी विद्यार्थी,संबंधित शाळा, क्लासेस यांचे सुद्धा आभार महाविद्यालयाच्या वतीने मानले.
त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रा. स्वप्निल निकम, प्रा. संजय झंजे, प्रा. सुजाता रिसवडकर यांनी प्रवेश प्रक्रिया पद्धत, लागणारी कागदपत्रे, भविष्यात असणाऱ्या जॉबची संधी, शैक्षणिक पात्रता, विविध शाखा व त्यानुसार असणाऱ्या संधी याबद्दल थोडक्यात माहिती दिली. एकूण चार सत्रात परीक्षा घेण्यात आली होती. पहिल्या सत्रात प्रथम क्रमांक चि. वेदांत कुलकर्णी द्वितीय क्रमांक कु. सानिया बागवान व तृतीय क्रमांक चि. शिवराज वाघ यांनी मिळविले. दुसऱ्या सत्रात प्रथम क्रमांक कु. गौरी कदम द्वितीय क्रमांक कु.अनिता शिंदे व तृतीय क्रमांक कु. मयुरी तळेकर यांनी मिळविले.
तिसऱ्या सत्रात प्रथम क्रमांक चि. आदर्श लोलगे द्वितीय क्रमांक चि. आदित्य भोसले व तृतीय क्रमांक चि. चक्रधर पावसे यांनी मिळवले.
चौथ्या सत्रात प्रथम क्रमांक कु. सृष्टी चव्हाण द्वितीय क्रमांक कु. साक्षी अवताडे तृतीय क्रमांक कु. ऋतुजा देवकर यांनी मिळवले.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, प्रा. सागर फुले, प्रा. सचिन पांढरे व प्रा. संजय झंजे यांच्या हस्ते रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस देऊन करण्यात आला. सदर परीक्षेमध्ये अकलूज व परिसरातील एकुण ५६२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीकांत कासे तर आभार प्रदर्शन प्रा. अनील कोकरे यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. सागर फुले,सर्व विभाग-प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शिपाई यांनी काम पाहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा