Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २७ मे, २०२४

*निरवांगी ता. इंदापूर येथील पद्मभूषण वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा 100 टक्के निकाल*

 


*इंदापूर तालुका -प्रतिनिधी*

 *एस.बी.तांबोळी*

  *टाइम्स 45 न्युज मराठी.

दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल दुपारी १ वा जाहीर झाला असून त्यात नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटी निरवांगी संचलित पद्मभूषण वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. हनमंतराव पोळ, उपाध्यक्ष विठ्ठल पवार, सचिव पांडुरंग पाटील, संस्थेचे सर्व विश्वस्त विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. उत्तम निकालाची परंपरा कायम राखत पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. विद्यालयाचे पहिले तीन मानकरी 



प्रथम कु. किसवे त्रिशा तानाजी - ९४.४०%, द्वितीय कु. नांगरे अर्चना दत्तात्रेय ९२.४०% व बोराटे राजनंदनी आप्पासो ९२.४०, तर तृतीय क्र काळे वैष्णवी विष्णू ९२.२०% याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक शिरसट के. एच. यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा