Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २७ मे, २०२४

*अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचा दहावीचा निकाल ९७.७ टक्के **


 

*अकलूज ------प्रतिनिधी*

 *केदार लोहकरे*

  *टाइम्स 45 न्युज मराठी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे बोर्ड यांच्या वतीने मार्च २०२४ मध्ये झालेल्या इयत्ता १० वी परीक्षेचा अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचा निकाल ९७.७ टक्के लागला.संस्थेच्या एकूण ३३ शाखेतून १०वी परीक्षेसाठी २९०१ विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी २८१६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन संस्थेचा निकाल ९७.७ टक्के लागला

           संस्थेमध्ये जिजामाता कन्या प्रशालेची विद्यार्थिनी कु. युगंधरा प्रेमनाथ रामदासी हिने ९७.४० टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकावला. तर सदाशिवराव माने विद्यालयाचा ऋषिकेश सुधीर कुंभार याने ९७ टक्के गुण मिळवित द्वितीय क्रमांक व श्रेयस स्वानंद पवार याने ९६.२० टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक पटकावला. 

              संस्थेतील लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर,श्री शंभू महादेव विद्यालय उंबरे दहिगाव,श्री विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय विझोरी,श्री गणेश विद्यालय पिंपळनेर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय वेळापूर, प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी,श्री बाललिंग विद्यालय फोंडशिरस,मोहनराव पाटील विद्यालय बोरगाव या आठ शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.तर महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर ९९.४७ टक्के,कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेज सदाशिवनगर ९९.४२ टक्के,जिजामाता कन्या प्रशाला अकलूज ९९.९ टक्के,श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नातेपुते ९८.६५ टक्के, सदाशिवराव माने विद्यालय मानकी ९८.२६ टक्के,श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय कोथरूड ९८.२२ टक्के, मोरजाई विद्यालय मोरोची ९८.११ टक्के,श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय मांडवे ९८.४ टक्के,श्री चक्रेश्वर विद्यालय चाकोरे ९७.५६टक्के,सदाशिवराव माने विद्यालय अकलूज ९७.४३ टक्के, श्री पळसेश्वर विद्यालय पळसमंडळ ९७.२२ टक्के,श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर ९६.६१ टक्के,श्री संभाजी बाबा विद्यालय इस्लामपूर ९६.४३ टक्के,संत तुकाराम विद्यालय बोंडले ९५.८३ टक्के,रामलिंग विद्यालय कुरबावी ९५.८३ टक्के,श्रीनाथ विद्यालय लोंढे मोहितेवाडी ९५.४५ टक्के, श्री विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय कोळेगाव ९५.१२ टक्के,श्री समर्थ रामदास विद्यामंदिर शिवथर ९४.७४ टक्के,श्री विजयसिंह मोहिते विद्यालय वाघोली ९३.३३ टक्के, कृष्णानंद विद्यामंदिर पाटीलवस्ती ९३.१५ टक्के,श्री सावतामाळी विद्यालय माळेवाडी ९२.४५ टक्के,श्री हनुमान विद्यालय लवंग ८९.८६ टक्के,श्री काळभैरव विद्यालय गुरसाळे ८९.४७ टक्के, अकलाई विद्यालय अकलूज ८५.१९ टक्के,रात्र प्रशाला अकलूज ४० टक्के.

         सर्व विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,सदस्या कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील,सर्व संचालक मंडळ, विविध शाखेचे शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य, शाखाप्रमुख यांनी अभिनंदन केले आहे.


 *चौकट*


*संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवणारे विद्यार्थी कु.अपूर्वा सचिन राऊत,कु. शिवांजली धनाजी पवार,कु. राहतबतुल लालासाहेब मुजावर (सर्व जिजामाता कन्या प्रशाला अकलूज) व ऋषिकेश सुधीर कुंभार (सदाशिवराव माने विद्यालय अकलूज) या विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा