Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १ मे, २०२४

*महायुतीचे उमेदवार -रणजीत सिंह नाईक निंबाळकर ,यांच्या प्रचारार्थ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री "रामदास आठवले "यांची 2 मे रोजी सकाळी 9 वाजता श्रीपुर येथे जाहीर सभा*

 


*श्रीपूर----बी.टी.शिवशरण

माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी महायुतीचे स्टार प्रचारक व आरपीआय आठवले गट राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची उद्या सकाळी नऊ वाजता श्रीपूर मध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेला भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आरपीआय रासप युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपचे प्रांतीक सदस्य राजकुमार पाटील व आरपीआयचे वरिष्ठ नेते कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत रामदास आठवले यांची अचानक श्रीपूर येथे जाहीर सभा आयोजित केल्याने भाजप युतीचे व आरपीआय आठवले गट चौदा गावांतील कार्यकर्ते नेते उपस्थित रहाणार आहेत रामदास आठवले श्रीपूरला सात वर्षांनंतर प्रथमच येत आहेत त्यामुळे श्रीपूर आरपीआय शहर शाखा यांचे वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे

उद्याच्या रामदास आठवले यांच्या जाहीर सभेकडे माढा लोकसभा मतदारसंघातील राजकारण्यांचे लक्ष लागून राहिले आहे एका दिवसात सभेची श्रीपूर मध्ये जंगी तयारी करण्यात येत आहे रामदास आठवले यांच्या सभेसाठी माळशिरस माढा पंढरपूर फलटण माण सांगोला इंदापूर तालुक्यातील आरपीआयचे नेते कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत अशी माहिती आरपीआय आठवले गट पदाधिकाऱ्यांनी दिली आहे रामदास आठवले यांच्या हस्ते विश्वभूषण परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे त्यांच्या स्वागतासाठी आरपीआयचे ज्येष्ठ नेते तुकाराम बाबर शामराव भोसले बी टी शिवशरण भारत आठवले बापूसाहेब पोळके गणेश सावंत विश्वजीत भालशंकर संजय खरे रमेश भोसले गौतम आठवले अनिल दळवी दावल शिवशरण राजू नवगीरे नितीन आठवले महादेव सावंत अतिश आठवले सुधीर भोसले व अनेक कार्यकर्ते तयारी करत आहेत अशी माहिती आरपीआयचे श्रीपूर शहर अध्यक्ष गणेश सावंत व शहर सरचिटणीस विश्वजीत भालशंकर यांनी दिली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा