*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
महाराष्ट्र राज्या
बळीराजा मान
काबाडकष्टाने
पिकवतो रान ॥ १ ॥
थोर ती संस्कृती
संत परंपरा
जीवनाचा अर्थ
समजावी खरा ॥ २ ॥
कानाकोपऱ्यात
गुंजे ललकार
आदर्श विचार
खरा अलंकार ॥ ३ ॥
भगवा तो ध्वज
महाराष्ट शान
अखंड स्मरूनी
गाऊ गुणगान ॥४ ॥
निसर्गसृष्टीत
सह्यादी विस्तार
महाराष्ट्र राज्य
माहिमा अपार ॥५ ॥
नऊवारी साडी
खरा वस्त्रसाज
जय महाराष्ट्र
निनाद तो आज ॥ ६ ॥
कडेकपारीत
तुतारी गर्जती
महाराष्ट्रदिनी
नगारे वाजती ॥७ ॥
शिवबाचे राज्य
आनंदाने पाहू
संकटसमयी
एकत्रित राहू॥ ८ ॥
*कवयित्री*
*सुवर्णा घोरपडे*
संग्रामनगर-अकलूज
ता.माळशिरस जि.सोलापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा