अकलुज ----प्रतिनिधी
शकूर तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूज येथील विद्यालयात १ मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गौरव गीत गाऊन जयघोष केला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेतील सर्व शाखेत व विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविलेली कु. क्रांती पांढरे (इ.११वी विज्ञान) हिच्या शुभहस्ते व शि. प्र. मंडळ अकलूज चे संचालक बाळासाहेब सणस, शाळा समितीचे इक्बाल काझी, आप्पासाहेब मगर, ॲड. रणजितसिंह माने-देशमुख यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी केले. यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अनेक महान संत यांच्या विचारांनी निर्माण झालेला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात अनेक थोर महापुरुष होऊन गेले आहेत असे सांगून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा इतिहास, कामगार दिनाचे महत्व, विद्यालयाच्या निकालाची उज्वल परंपरा, विविध उपक्रम, कला, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी याची माहिती देऊन १ मे महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचा व गुणवंत विद्यार्थिनी कु. क्रांती पांढरे हिचा सत्कार संचालक बाळासाहेब सणस यांच्या हस्ते करण्यात आला.
*विद्यालयाचा निकाल*
🔸इ. ५ वी ते ८ वी- १००%
🔸इ. ९ वी- ९२.४६%
🔸इ. ११ वी- १००% (विज्ञान, वाणिज्य, कला, व्यवसाय)
यानंतर वार्षिक निकालाचे वाचन करण्यात आले. यामध्ये विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने रु. ८०००/- व विद्यालयाचे रु. २०००/- असे एकूण १००००/- रुपयांच्या रोख बक्षीसाचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिॅम्पियाड परीक्षेत सुवर्ण पदक मिळेविलेल्या ४ विद्यार्थ्यांचा, एनएमएमएस या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या ओम खडके, सिद्धार्थ म्हेत्रे यांचा पालकांसमवेत व मार्गदर्शक शिक्षक उमेश बोरावके यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडा विभागातील विभाग, राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर यश मिळविलेल्या खेळाडूंना संस्थेच्या वतीने प्राप्त झालेल्या रु. ३१२००/- बक्षीस व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
विशेष सत्कार प्रसंगी विद्यालयातील नियत वयोमानानुसार ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होणारे उपप्राचार्य संजय शिंदे, विनायक रनवरे, उपशिक्षक संजय नागणे, रघुनाथ घुले, सिद्धेश्वर साठे, प्रयोगशाळा सहाय्यक चंद्रकांत देवकर, अंकुश भाट यांचा सेवानिवृत्त निमित्त विद्यालयाच्या वतीने मान्यवरांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषण प्रसंगी बाळासाहेब सणस यांनी ‘महाराष्ट्र दिनाच्या’ व ‘कामगार दिनाच्या’ व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय परीक्षेत यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास शिक्षक पालक संघांचे सदस्य, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, शिक्षक प्रतिनिधी, पर्यवेक्षक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, पालक, बहुसंख्य विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाकीर सय्यद, निकालाचे वाचन राजकुमार पाटील, असिफ झारेकरी, दीपाली लोखंडे, सिद्धेश्वर साठे यांनी केले. आभार पोपट पवार यांनी मानले. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत, वैभवशाली इतिहास जपत,प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार करत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यानंतर वर्गनिहाय वार्षिक निकालचे वाटप करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा