*विशेष -प्रतिनिधी--राजु मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--84088 17333
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमध्येही त्याच प्रकारची दुर्घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड शहरात वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसाने, मोशी परिसरात रस्त्याच्या कडेला असलेले महाकाय होर्डिंग वाहनांवर कोसळले. मोही येथील जय गणेश साम्राज चौकातील रस्त्यावर असलेले हे होर्डिंग वाहनांवर कोसळले. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र होर्डिंग खाली आलेली 3 ते 4 वाहनं चिरडली गेली आहेत.
या दुर्घटनेत जीवितहानी टळली असली तरी एकूणच होर्डिंगज हा विषय चिंतेचा विषय बनला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा