*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
श्री शंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत ऊस तोडणी मजुरांना ३४ टक्के वाढीव फरक अदा एकरक्कमी फरक देणार असुन राज्यातील एकमेव शंकर सहकारी साखर कारखाना आहे असे व्हाईस चेअरमन--मिलींद कुलकर्णी यांनी प्रसिध्दी पञका द्वारे म्हटले आहे.
सदाशिवनगर साखर संघ स्तरावर झालेल्या ऊस तोडणी व बैलगाडीने
वाहतुकीचे सुधारीत सामंजस्य करारानुसार ऊस तोडणी मजुरांना तोडणी दरामध्ये ३४ टक्के वाढ लागु करुन फरकाची संपूर्ण रक्कम दि.१३-०५-२०२४ रोजी बँकेत जमा करण्यात आलेची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन मिलींद कुलकर्णी यांनी दिली. तरी गळीत हंगाम २०२४-२५ करीता सर्व तोडणी वाहतुक कंत्राटदारांनी जास्तीत जास्त करार करुन श्री शंकर कारखान्याकडे ऊस तोडणी वाहतुकीचे काम करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सिझन २०२३-२४ मध्ये गळीतास आलेल्या ऊसास पंधरवडावाईज संपुर्ण ऊस बिलाची रक्कम रु.२६००/- प्रतिटना प्रमाणे ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. कारखान्याची सिझन २०२३-२४ मधील एफ.आर.पी. रक्कम रु.२१९२/- प्रतिटन असून कारखान्याने दुष्काळी परिस्थितीमध्ये सुध्दा ऊस उत्पादकांना एफ.आर.पी. पेक्षा वाढीव रक्कम रु.४०८/- प्रति टनाप्रमाणे जादा रक्कम अदा केली आहे.
तरी सर्व ऊस उत्पादक शेतकरी व ? सभासद यांनी सिझन २०२४-२५ करीता कारखान्यास जास्ती-जास्त ऊस पुरवठा करण्याचे आवाहन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा