*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या अयोध्या पौळ यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरात घुसून ही मारहाण केली, असा आरोप अयोध्या पौळ यांनी केला आहे. या घटनेनंतर त्यांनी सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडिओ करून मारहाण झाल्याचे सांगितले आहे. यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्या असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
असे अनेक ओरकांडे आहेत शरीरावर.. सिनियर पीआय आल्यात मला पोलीस स्टेशनला घेऊन जायला.. खुप फोन येत आहेत महाराष्ट्रातून.. फोनला बॅटरी कमी आहे म्हणून कोणाचेही फोन घेत नाही समजून घ्या..
मी सुरक्षित आहे, 2-4 गद्दार गेल्याशिवाय मी काही जात नसते तेंव्हा काळजी नसावी..
काही महिला घरात घुसल्या. त्यांनी मला मारहाण केली,असा आरोप अयोध्या पौळ पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर लाइव्ह केला. संबंधित महिला कार्यकर्त्या यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्या असल्याचा त्यांचा आरोप आहे. यासंदर्भात त्यांनी एक्सवरही पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग केलं आहे. लोकांना पराभव समोर दिसत असल्यानं हा हल्ला केला, असंही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
गद्दार लोकांना पराजय दिसतोय म्हणून हल्ला केला आहे.
काही महिला घरात घुसल्या आणि त्यांनी मला मारहाण केली. माझा मोबाईल हिसकावून गेल्या आहेत. तसेच त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप अयोध्या पौळ-पाटील यांनी केला. मला मारहाण झाली. मला काही झालं तर त्याला यामिनी जाधव जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी अयोध्या पौळ पाटील यांना फोन करून विचारपूस केली आहे. यासंदर्भात पोलिसांत रितसर तक्रार करण्यासही ठाकरे यांनी फोनवरून सांगितलं
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा