*अकलुज ----प्रतिनिधी*
*लक्ष्मीकांत-----कुरुडकर*
*टाइम्स 45 न्युज मराठी.
*सदाशिवनगर (ता. माळशिरस) सदाशिवनगर,४३-माढा लोकसभा मतदार संघ, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ, माळशिरस तालुक्याचे जनतेचे आमदार, लोकनेते उत्तमराव जानकर (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज),स्वरूपाराणी मोहिते पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य)रेणुकादेवी मोहिते पाटील,युवानेते बाबासाहेब माने पाटील, भानुदास आप्पा सालगुडे व माळशिरस तालुक्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख मान्यवर-पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ,माळशिरस तालुकातील गावभेट दौरा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी लोकसभा निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उत्तमराव जानकर यांचा सन्मान सदाशिवनगर ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गावचे आजी- माजी सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, व गावातील महाविकास आघाडीचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा