*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
कोडोली ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे दिनांक २८मे 2024 रोजी 'अर्धदैनिक यशवंत ' या अंकाच्या निर्मितीचा प्रारंभ करुन स्वातंत्र्यवीर वि . दा. सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते.
सावरकरांच्या कार्याची थोरवी अधोरेखित करताना डॉ. विश्वनाथ पाटील म्हणाले," सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला, यात तिळमात्र शंका नाही. कोणत्याही महान विभुतींना नावे ठेवून बदनाम करण्यापूर्वी त्यांचा त्याग आणि त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा दुर्लक्षित करता कामा नयेत."
डी. पी. पाटील यांनी प्रास्तविक केले. दशरथ आयरे यांनी सूत्रसंचलन केले. अनिल पांडुरंग कांबळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसोबत वरिष्ठ लिपिक अनिल इंदुलकर , ग्रंथपाल सूरज इंगळे आणि सेवक तानाजी गणपती मोहिते आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा