Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २८ मे, २०२४

*राज्यात दिवाळीपूर्वीच विधानसभाच्या निवडणुका होऊन फटाके फुटणार ?*

 


*उपसंपादक---नुरजहाँ शेख*

  *टाइम्स 45 न्युज मराठी

लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा अलीकडे पार पडला असून एक जूनला सातव्या टप्प्यातील आठ राज्य आणि 57 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्यानंतर चार जूनला लोकसभेचा निकाल जाहीर होईल. लोकसभा निवडणुकीत सुरू असतानाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे पक्षांकडून याची तयारीही सुरू झाली आहे.

     महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. तर तीन नोव्हेंबरपर्यंत हरियाणाची मुदत संपत आहे. तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडून निकाल येणे अपेक्षित आहे. त्यात दोन्ही राज्यांच्या विधानसभेची मुदत 23 दिवसांच्या अंतराने असल्याने दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

    2009 पासून महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची निवडणूक एकाचवेळी होत आहे. यंदा 29 नोव्हेंबर ते तीन नोव्हेंबर या कालवधीत दिवाळी आहे. मात्र सणाच्या दिवसात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका घेण्यास बराच अवधी असला तरी हरियाणाची निवडणूक आधी असल्याकारणाने दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात 21 ते 26 ऑक्टोबरच्या जवळपास राज्यात मतदान होऊ शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा