*टाइम्स 45 न्युज मराठी.
अकलूज येथील जुन्या काळातील नामांकित डॉक्टर शांतीलाल शिवलाल गांधी वय ९६ यांचे आज पुणे येथे वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, डॉ.निलिमा गांधी,मुलगा डॉ.सलील गांधी,दोन विवाहित मुली जावई दोन सुना असा परिवार आहे.अकलूजचे फॅमिली डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध होते. अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना व श्रीपुर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे ते मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा