**श्रीपूर --बी.टी .शिवशरण
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला मार्गस्थ होत असताना बोरगाव मुक्कामी असतो तेव्हा तो पालखी सोहळा श्रीपूर मध्ये आल्यानंतर कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना प्रवेशद्वार समोर दर्शनासाठी काही वेळ थांबवला जातो त्यानंतर मारुती मंदिरात पंधरा ते वीस मिनिटे दर्शनासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुका अर्धा तास ठेवल्या जातात त्यानंतर पालखी बोरगाव कडे मार्गस्थ होते या दरम्यान पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते लहान मुले महिला वृद्ध भावीक यांना दर्शन घेण्यास अडथळे येतात निम्म्या भाविकांना दर्शन मिळते बाकीचे पालखी रथाचे व कळसाचे दर्शन घेऊन धन्यता मानतात श्रीपूर पंचक्रोशीतील तमाम भाविकांची जगद्गुरु संत तुकाराम महाराज देहू संस्थान विश्वस्तांकडे विनंती मागणी आहे की श्रीपूर येथे पालखी सोहळा मारुती मंदिरात किमान एक तास पादुका दर्शनासाठी ठेवण्यात याव्यात त्यामुळे सर्वांना दर्शन घेता येईल
*दि बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लि श्रीपूर या कंपनीकडे श्रीपूर मधील कारखाने होते तेव्हा सदर कंपनी कडून पालखी सोहळा श्रीपूर मध्ये यायचा तेव्हा कारखान्याचे वतीने दर्शन बारी साठी बांबूचे कठडे उभे केले जात सर्व सुरक्षारक्षक तसेच श्री चंद्रशेखर विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी स्वयंसेवक म्हणून तैनात केले जात होते तसेच शिस्तीत सर्वांना दर्शनासाठी रांगेत उभे करून सोडले जात होते त्यामुळे सर्वांना सुलभ दर्शन घेता येत होते*
सध्या दि बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लि कंपनी श्रीपूर मध्ये नाही त्यांच्या नंतर पालखी सोहळा व्यवस्था दर्शन बारी व सुरक्षारक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी स्वयंसेवक म्हणून तैनात केले जात नाहीत ही बाब लक्षात घेऊन देहू संस्थान विश्वस्तांनी श्रीपूर पंचक्रोशीतील भाविकांची विनंती मान्य करावी या बाबत देहू संस्थान यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार केला जाणार आहे अशी माहिती येथील अनेक भाविकांनी दिली आहे
देहू हून जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपुरकडे मार्गस्थ होत असताना श्रीपूर मध्ये थांबण्याची परंपरा गेली अनेक वर्ष अबाधित आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा