*अकलूज ----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
गोवा येथे दीनानाथ मंगेशकर नाट्य अकॅडमीच्या भव्य रंगमंचावर अकलूजच्या लावणी स्पर्धेतील लावणी कलावंतांनी आपली लावणी सादर करत. मराठमोळ्या लावणीने गोवाकरांची मने जिंकली.
महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या " द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड " या कार्यक्रमाच्या निमित्ताने लावणी महोत्सवाचे आयोजित करण्यात आला होते. या लावणी महोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अकलूज लावणी स्पर्धेतील कलावंत,लावणी सम्राज्ञीनी आरती काळे नगरकर या होत्या.यावेळी अकलूज लावणी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या वैशाली समसापूरकर तसेच अकलूज लावणी स्पर्धा गाजवलेल्या वैशाली वाफळेकर खामगावकर पार्टीतील माया अंधारे,प्रीती शिंदे,या कलावंतांनी तसेच लावणी प्रशिक्षक योगेश देशमुख यांनी लावणी महोत्सव गाजविला. एकापेक्षा एक पारंपरिक व चित्रपटातील लावणीने गोव्यातील प्रेक्षक भारावून गेले.वन्स मोर आणि टाळ्या शिट्ट्यांनी नाट्यगृह दम दमून गेले.या लावणी महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचे संचालक,अकलूजचे जेष्ठ पत्रकार व लावणी कलेचे गाढे अभ्यासक चंद्रकांत कुंभार व रहमान काझी यांनी केले होते.
यावेळी ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी चित्रपट अभिनेत्री आरती काळे नगरकर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भास्कर अवॉर्ड मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सहभागी झालेल्या लावणी कलावंतांना माजी केंद्रीय कायदामंत्री अॕड. रमाकांत खलप,पद्मश्री विनायक खेडेकर,गोवा पत्रकार अध्यक्ष राज तिलक नाईक,पद्मश्री संजय पाटील,आरती काळे नगरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजीव लोहार यांचे हस्ते या कलावंतांना भास्कर अवार्ड सन्मानचिन्ह सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला अकलूज लावणी स्पर्धेचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांनी पुरस्कार मिळाल्यालेल्या सर्व कलाकारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा